Vijay Wadettiwar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Vijay Wadettiwar: 'आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते'; वडेट्टीवारांच्या वक्तव्याने खळबळ

आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज देशाचे दोन तुकडे झाले असते. विजय वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्य

अंकिता खाणे (Ankita Khane)

परभणी येथे थायलंड येथील सहा फूट उंचीच्या पन्नास बुद्धरूप मूर्तीचे वितरण आणि आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लीम धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज देशाचे 2 तुकडे झाले असते, असं वडेट्टीवार म्हणालेत.

आज धर्माला धर्माशी लढवलं जात आहे, जातीला जातीशी लढवलं जात आहे. जर बाबासाहेबांनी दुसरा धर्म स्वीकारला असता, कल्पना करा जर बाबासाहेबांच्या डोक्यात मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा विचार आला असता तर या भारताचे दोन तुकडे करावे लागले असते, असं विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, मंदिरातील दानपेठ्या काढल्या तर पुजारी पळून जातील मंदिराची देखरेखही करणार नाहीत, असं वडेट्टीवार म्हणालेत. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

परभणीत गौतम बुद्धांच्या मूर्ती वितरण सोहळ्याला वडेट्टीवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज देशाचे तुकडे करावे लागले असते, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इतकचं नाही तर, मंदिरातील दानपेठ्यांवरूनही त्यांनी पुजाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. मंदिरातील दानपेठ्या काढल्या तर पुजारी पळून जातील मंदिराची देखरेखही करणार नाहीत, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, भजी आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

लग्नानंतर लगेचच रश्मिकाकडे गुड न्यूज! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

SCROLL FOR NEXT