vijay vadettiwar vijay vadettiwar
महाराष्ट्र बातम्या

‘महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत निर्बंध राहतील’

ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना (coronavurus) चांगलाच पसरत चालला आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यामुळेच कोरोनाचे नियम अधिकच कडक करण्यात आले आहेत. मात्र, आता कोरोना मुंबईच्या (mumbai) बाहेर पडताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत निर्बंध कायम राहतील, असे काँग्रेसचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणाले.

महाराष्‍ट्रात कोरोनाने पुन्हा पीक घेतला आहे. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनासाठी (coronavurus) लादलेले निर्बंध १५ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहेत. मुंबईतील लोकलबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच शाळा सुरू करण्याबाबतही कुठलाही निर्णय झालेला नाही. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणाले.

नालायक हा शब्द मुद्दामहून वापरतोय

महाज्योतीतून विद्यार्थ्यांचे पैसे शेतकऱ्यांना दिल्याचा आरोप करणारे कोण नालायक आहेत? नालायक हा शब्द मुद्दामहून वापरतोय. अर्धवट माहितीच्या आधारे मूर्खासारखे आरोप करतात, असे विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणाले.

अहवाल सादर करण्याचे निर्देश

करडईचे बियाणे शेतकऱ्यांना दिले आहे. त्यावर प्रक्रिया करून क्लस्टर तयार करणार आहे. यातून शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे, असेही विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT