Leader Of Opposition Esakal
महाराष्ट्र बातम्या

Leader Of Opposition: विरोधीपक्ष नेतेपदाची घोषणा झाली! अजित पवारांनी हाताला धरून वडेट्टीवारांना बसवलं खुर्चीवर

सभागृहात विधानसभा अध्यक्षांनी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी घोषणा केली

अंकिता खाणे (Ankita Khane)

विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या नावाची घोषणा सभागृहात केली आहे. त्यानंतर सभागृहात सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विजय वडेट्टीवार यांच्या हाताला धरुन विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसवलं आहे.

अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले आहेत. शिवसेना-भाजपला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता.

अखेर काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कुणाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून विजय वडेट्टीवार आणि संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, अखेर विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT