Vijay Wadettiwar esakal
महाराष्ट्र बातम्या

Vijay Wadettiwar : सरकारमधील लोकांची गुंडगिरी वाढली; वडेट्टीवारांनी 'ही' नावं घेऊन सांगितले कारनामे

संतोष कानडे

मुंबईः विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारमधील आमदार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या गुंडगिरीचा पाढा वाचून ताशेरे ओढले. राज्यामध्ये सामान्य जनतेसह पत्रकारसुद्धा सुरक्षित नाहीत, असं म्हणत वडेट्टीवारांनी अजित पवारांनाही लक्ष्य केलं.

विजय वडेट्टीवार बोलताना म्हणाले की, सध्या राज्याचे पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्या पक्षाचं नेतृत्व करतायत हे स्पष्ट होत नाही. अजितदादा, अजून तुम्ही राष्ट्रीय नेते झालेले नाहीत. राष्ट्रीय पातळीवरील वक्तव्य कोणत्या अधिकारात करता हे जनतेला कळलं पाहिजे, असं ते म्हणाले.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, विभिन्न पक्षांना एकत्र आणून 38 सत्ताधारी पक्ष खिचडी करत आहेत. ज्या विचारधारेच्या पक्षाला विरोध केला त्यांच्यासोबत ते एकत्र बसले आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना सोबत घेऊन खिचडी केली. भाजप इतर पक्षातून आलेल्या लोकांना सोबत घेऊन पाठराखण करतं हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील गुन्हेगार सुसाट आहेत. महिलांवर रोज अत्याचार होत आहेत, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. सरकारला पाठिंबा देणारे हितेंद्र ठाकूर यांनी पालिका आयुक्तांना समोरासमोर धमकी दिली, प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना ताजी आहे, किशोर पाटील या आमदाराच्या लोकांनी पत्रकाराला मारहाण केली, मीरा भायंदरच्या आमदार ज्यांनी या सरकारला पाठिंबा दिला त्यांनी एका इंजिनिअरला मारलं. या राज्यात पत्रकारदेखील सुरक्षित नाहीत. कायद्याचा धाक उरला नाही, नागपूर, पुण्यात क्राईम रेट वाढल्याचे वडेट्टीवारांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT