vijay wadettiwar on municipal elections during corona sure in maharashtra  sakal
महाराष्ट्र बातम्या

इम्पेरिकल डेटाबाबत पुढील दहा दिवसात स्पष्टता येईल : वडेट्टीवर

सरकार आडनावाच्या आधारे ओबीसींचा डेटा गोळा करत असल्याचा आरोप ओबीसी समाजाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षण आणि अम्पेरिकल डेटावरून (Empirical Data) भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. या मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपकडून राज्य सरकारवर हल्लाबोलदेखील करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ते म्हणाले की, येत्या 10 दिवसात इम्पेरिकल डेटा संदर्भात स्पष्टता येईल असे त्यांनी म्हटले आहे. (vijay Wadettiwar On Empirical Data )

दरम्यान, सरकार आडनावाच्या आधारे ओबीसींचा डेटा गोळा करत असल्याचा आरोप ओबीसी समाजाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी केले आहे. तसेच राज्य सरकारकडून ओबीसींची फसवणूक सुरू असल्याचेही राठोड यांनी म्हटले आहे. डेटा गोळा करण्यामध्ये आमचं बारी लक्ष असल्याचे सांगत वडेट्टीवर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस बोलले त्यातले काही मुद्दे खरे आहेत.

डेटा गोळा करताना ग्रामपंचायतींशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायती स्थानिक आडनावं जातीनिहाय तपासून डेटा देतील. याशिवाय नेमलेल्या कमिशनला योग्य सूचना देण्यात आल्याचेही यावेळी वडेट्टीवर यांनी यावेळी सांगितले. आडनावावरून नोंद करताना ग्रामपंचायतीसोबत माहिती पडताळण्याचे आदेश देण्यात आले आहे. ओबीसींचं कोणतही नुकसान आम्ही होऊ देणार नाही असेही वडट्टेवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT