Sambhaji Bhide Clean Chit In Bhima Koregaon  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide : ''भिडेंची तिरंग्याच्या विरोधात रॅली... आता गुरुजीच्या विद्यार्थ्यांची भूमिका काय?'' वडेट्टीवारांचा थेट हल्ला

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः आज देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वत्र तिरंग्याचा उत्सव सुरु असताना तिकडे सांगलीमध्ये मात्र शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भगवा रॅली काढली आहे. त्यांच्या या रॅलीमुळे काँग्रेसमधून संताप व्यक्त होतोय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत कडवट शब्दांमध्ये भिडेंचा समाचार घेतला.

मागच्याच महिन्यात संभाजी भिडे यांनी महत्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या विधानामुळे राज्यभरातून संताप व्यक्त झाला. पावसाळी अधिवेशनातदेखील विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्यावर कठोर करावाईची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे.

महापुरुषांच्या अवमानाचा विषय ताजा असतानाच आज स्वातंत्र्यदिनी सांगलीमध्ये संभाजी भिडेंनी भगवा रॅली काढली होती. त्यावर बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मनोहर कुलकर्णी हा माणूस तिरंग्याला विरोध म्हणून भगवी रॅली काढतो आहे. ज्यांनी त्यांना गुरुजी म्हणून संबोधलं त्या विद्यार्थ्यांची भूमिका काय, हे महाराष्ट्र बघणार आहे.

पुढे बोलतांना वडेट्टीवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान एकीकडे तिरंग्याला सलाम करतात आणि त्यांचे भक्त तिरंग्याला विरोध करतात, भगवा रॅली काढतात. यातूनच यांचा रंग कोणता हे दिसून येत आहे. या भिडेंनी राष्ट्रद्रोह केलेला आहे, भिडे खऱ्या अर्थाने राष्ट्रविघातक आहेत.

''भिडेंवर त्वरित कारवाई झाली पाहिजे, नाहीतर हा देश सरकारला माफ करणार नाही. ज्यांनी गुरुजी म्हटलंय त्या विद्यार्थ्याची भूमिका काय असेल? हे देश बघतोय. निदान आम्ही त्यांच्या सोबत नाही हे सिद्ध होईल म्हणून तरी कारवाई करावी'' अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT