Vinayaak Mete Sakl
महाराष्ट्र बातम्या

Vinayak Mete Accident: विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात; मेटे गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांच्या गाडीला आज पहाटे अपघात झाला असून या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्यात हा अपघात झाल्याची माहिती आहे.

(Vinayak Mete Car Accident)

दरम्यान, पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडकडून मुंबईकडे येत असताना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात झाल्याची माहिती त्यांचे सहकारी आणि चालक एकनाथ कदम यांनी दिली. अपघात झाल्यानंतर तब्बल एका तासानंतर मदत मिळाली असल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून मेटे यांचे स्वीय सहाय्यक आणि मेटे हे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात मेटे यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला मार लागला आहे. त्याचबरोबर स्वीय सहाय्यकांनासुद्धा मार लागल्यामुळे त्यांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मेटे सध्या एमजीएम रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. दरम्यान एअर बॅग्स असल्यामुळे जास्त मार लागला नसल्याचं सहकारी कदम यांनी सांगितलं.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे नेते प्रविण दरेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भेटीला जाणार आहेत. त्याबरोबर शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि मेटे यांचे कुटुंबिय त्यांच्या भेटीला पोहोचणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि दरेकर हे आज मुंबई पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT