महाराष्ट्र बातम्या

'हे' आहेत महाराष्ट्रातील सर्वात कमी संपत्ती असलेले आमदार

रुपेश पाटील

विरोधकांनी पैसे वाटले.. पण मला विश्वास होता 'मी' जिंकेन.. असं म्हणणारे विनोद निकोले. विनोद हे डहाणूचे आमदार आहेत. पालघरच्या डहाणूमधून ते आमदार म्हणून निवडून आलेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. भाजपच्या हातून कम्युनिस्टांचा गड त्यांनी खेचून आणलाय. त्यांच्या या कामगिरीनंतर चर्चा रंगली आहे ती त्यांच्या गरिबीची.

कायमच कोट्यवंधींच्या संपत्तीमुळे लोकप्रतिनिधी चर्चेत असतात. मंगलप्रभात लोढा, पराग शाह ही त्यातलीच काही नावं.  पण आता चर्चा आहे निकोलेंची. कारण आहे त्यांची  51 हजार 82 रुपये इतकी संपत्ती. या व्यतिरिक्त निकोलेंचं स्वतःचं घरं सुद्धा नाहीये,

वडील शेतमजूर आहेत. शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून विनोद यांनी एस वाय बीए नंतर शिक्षण सोडून दिलं आणि ओघाओघाने ते राजकारणात आले. 

विनोद निकोले हे  डहाणूतल्या वाकी इथं सध्या ते भाड्याच्या घरात राहतात. त्यांची पत्नी आश्रम शाळेत सेविका म्हणून काम करते. तर, निकोले महिन्याकाठी 4 ते 5 हजारांची कमाई करतात. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.

विनोद निकोले आता आमदार झालेत आणि विधानसभेत जाणार आहेत.  माकपसाठी गड पुन्हा मिळवल्याचा त्यांना आनंद आहे. निकोले कुटुंबियांसाठी तर मुलाच्या यशाचा आनंद त्याहूनही मोठा आहे. गरिबीतून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाला लोकांनी केलेला लाल सलाम हा अधिक आनंददायी आहे आणि प्रेरणा देणारा आहे. 

WebTitle : vinod nikole maharashtras poorest MLA

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT