Vinod Tawde BJP Esakal
महाराष्ट्र बातम्या

Vinod Tawde: महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी? विनोद तावडेंना मिळणार मोठी जबाबदारी, भाजप निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra BJP: या शर्यतीत अनेक नावे आहेत. मात्र, सध्या तावडेंचा वरचष्मा असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. तावडे हे महाराष्ट्रातील निवडणुकीतील ओबीसी समाजाचे नेते आहेत.

आशुतोष मसगौंडे

BJP National Working President: येत्या शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेल्या सदस्यत्व मोहिमेसह अन्य संघटनात्मक निवडणुकांची रूपरेषा आखण्यात येणार आहे.

पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्यापूर्वी कार्याध्यक्षाचे नाव जाहीर करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाचा विचार केला जात आहे.

जर तावडे यांनी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपद मिळाले तर राज्यातील राजकारण आणि भाजमधीलही अनेक समिकरणे बदल्याची शक्यता आहे. त्यामुळे तावडे यांचे कार्याध्यक्षपद महाराष्ट्र भाजपच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी पूर्णवेळ अध्यक्ष निवडीसाठी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत सदस्यत्व मोहीम आणि 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत सक्रिय सदस्यत्व मोहीम राबविण्याची चर्चा होती.

मात्र, मध्यंतरी संसदेचे अधिवेशन सुरू आल्याने यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. सदस्यत्व मोहीम नवीन अध्यक्षांच्या निवडीपूर्वी असल्याने, किमान 50 टक्के राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका आवश्यक आहेत. अशात बैठकीत अध्यक्ष निवडीपूर्वी सर्व प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची रूपरेषा तयार केली जाणार आहे. या बैठकीला सर्व प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारीही उपस्थित राहणार आहेत.

गेल्या रविवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे आणि इतर काही वरिष्ठ नेत्यांशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष उपस्थित होते.

पूर्णवेळ अध्यक्ष निवडीसाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने आणि त्यादरम्यान हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत पूर्णवेळ अध्यक्षाची निवड होईपर्यंत कार्याध्यक्ष नेमण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे.

या शर्यतीत अनेक नावे आहेत. मात्र, सध्या तावडेंचा वरचष्मा असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.

2019 मध्ये विनोद तावडे यांना विधानसभेचे तिकिट नाकारल्यानंतर पक्षांत त्यांचे खच्चीकरण होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी तावडे यांना पक्षाचे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी दिली. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत तावडे यांचे पक्षात वजन वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT