Viral Twitter Anxiety esakal
महाराष्ट्र बातम्या

Viral Twitter Anxiety : अबब! विप्रोच्या बॉसची एनझायटीपासून वाचण्याची अजब ट्रिक

एनझायटी ही कधीही वाईट

सकाळ डिजिटल टीम

Viral Twitter Anxiety : एनझायटी ही कधीही वाईट. आजकाल खूप लोकांना एनझायटीचा त्रास होत असतो. ओव्हर थिंकिंग, अपूर्ण झोप, ॲसिडीटी, टेन्शन यामुळे एनझायटीचा त्रास वाढतो. पण एनझायटी वाढणं शरीरासाठी चांगल नाही. खरतर मानसिक तणाव आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाला आहे हे नाकरण कठीण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे काहीतरी मानसिक त्रास आहेतच.

आजकाल आपल्या मानसिक आरोग्यासाठी अनेक लोक सायकॉलॉजीस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घेत असतात. डिप्रेशन, एनझायटी, चिडचिड याचं लोकांमधल प्रमाण देखील वाढलं आहे. या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकत नसलो तरी रोजच्या आयुष्यातल्या घटनांना कसं सामोरं जायचं हे नक्कीच आपल्या हातात असतं. आपल्या बिझी शेड्युलमधून आपलं मानसिक स्वास्थ्य कसं नियंत्रित ठेवायचं यासाठी विप्रो कंपनीचे बॉस ऋषद प्रेमजी यांनी त्यांची स्ट्रेस बस्टर लिस्ट शेअर केली आहे.

या लिस्ट मध्ये त्यांनी 6 गोष्टी नमूद केल्या आहेत ज्याने त्यांचा स्ट्रेस रिलीफ करायला मदत होते. आणि गंमत म्हणजे त्यात त्यांनी म्हटलं याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. त्यांनी ट्विट केल आहे की,"माझे स्ट्रेस बस्टर आहेत, 1) झोप 2) व्यायाम 3) मसाज 4) आवडत्या आणि महत्त्वाच्या माणसांसोबत वेळ घालवणे 5) टीव्ही 6) स्वतःला तेवढं सिरीयसली न घेणं"

त्यांच्या या ट्विटला खूप लोकांनी पसंती दिली आहे, अनेक लोकं या पोस्टला रिट्विट करता आहेत. लोकं यावरती रिप्लाय सुद्धा देता आहेत.एका युजरने लिहिलं की, "स्ट्रेंथ ट्रेनिंग, झोप, नेटफ्लिक्स, रेग्युलर जिम, झोपण्यापूर्वी पुस्तकाची काही पान वाचायची, हे माझे स्ट्रेस बस्टर आहेत."

दुसऱ्या युजरने लिहिलं की, स्वतःला सिरीयसली घेयच नाही या वाक्याला त्यांचाच एक प्रसंग सांगत संमती दिली आहे, तो म्हणाला, "काही दिवसांपूर्वी पुणे विमानतळावर बोर्डिंग करतांना तुम्हीही इतर प्रवाशांसारखे इकॉनॉमी क्लास मधूनच ट्रॅव्हल करत होतात.. एवढी मोठी व्यक्ती असूनही त्याच ओझ न घेता तुम्ही फिरत होतात.. ते खरच आवडलं "अजून एका युजरने सांगितल की, स्ट्रेस रिलीफ करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला कमी गांभीर्याने घेणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT