महाराष्ट्र बातम्या

कौमार्य चाचणी यापुढे लैंगिक अत्याचार

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कौमार्य चाचणी हा यापुढे लैंगिक अत्याचार मानला जाणार असून, संबंधितांवर गुन्हा नोंदवला जाणार आहे. याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाणार आहे. संबंधित पोलिस ठाण्यांना तसे कळविले जाणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. दर महिन्याला राज्यातील सर्व जिल्ह्यांत महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

अनेक जाती-जमातींमध्ये विवाहानंतर मुलींचे कौमार्य तपासण्याचे प्रकार होतात. कंजारभाट जमातीतील अनेक मुलींना या चाचणीला सामोरे जावे लागत असल्याच्या घटना निदर्शनाला आल्या होत्या. त्यानंतर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने गृहराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच जातपंचायतीविरोधी समितीचे सदस्य आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. जमातीतील स्त्रियांना अपमानास्पदरीत्या वागवणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली. या बैठकीला गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात अशा घटना उघडकीस आल्यास संबंधितांवर गुन्हा नोंदवावा, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. 

जातपंचायत कायद्यात सुधारणा होणार 
कौमार्य चाचणीसारख्या अनिष्ट रुढीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. जातपंचायत कायद्यातही सुधारणा करण्यात येणार आहे. त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : मंचरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त; २५० पोलिस कर्मचाऱ्यांसह होमगार्डचा तगडा फौजफाटा तैनात

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

Kolhapur LPG Tanker Accident : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर LPG Gas टँकर पलटी; चालक जागीच ठार, रात्री 10 नंतर 'या' मार्गावरील वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT