Vishal Fate News 
महाराष्ट्र बातम्या

विशाल फटे संध्याकाळपर्यंत पोलिसांसमोर होणार हजर; व्हिडिओद्वारे दिली माहिती

पाचशे कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी विशाल फटे यानं आपण निर्देष असल्याचा दावा केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : गुंतवणूकीतून मोठ्या परताव्याची आमिषं दाखवून सुमारे पाचशे कोटींच्या कथीत घोटाळ्यातील प्रमुख आरोपी विशाल फटे (Vishal Fate) सध्या फरार आहे. पण आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आपण संध्याकाळपर्यंत पोलिसांसमोर हजर होणार असल्याचंही म्हटलं आहे. (Vishal Fate will appear before police till evening Information provided by video)

"लोकांना माझ्यावर विश्वास असेल तर त्यांनी वाट पाहावी किंवा ज्यांना माझ्यावर केस टाकायच्या आहेत त्यांनी बिनधास्त करा. यामध्ये मला काय शिक्षा व्हायची ती भोगायला मी तयार आहे. मला फाशीची शिक्षा जरी झाली तरी मी ती स्विकारायला तयार आहे. मला पळून जायचं नव्हतं आणि मी पळून जाणार नाही. काही गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न मी केला यासाठी मला जो तीन-चार दिवसांचा वेळ हवा होता त्यातच या सर्व गोष्टींचा बोभाटा झाला. त्यामुळं मला काही हालचाल करायला जागाच उरली नाही. संध्याकाळपर्यंत मी माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन हजर होणार आहे," असं फटे यानं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

पोलिसांनी माझ्याविरोधातील तक्रारी घेतल्या तेव्हा शहानिशाच केली नाही. माझी बँक अकाउंट्सची स्टेटमेंट काढा, त्यातील रक्कमा चेक करा. किती दिले? कुणाला दिलेत? काही लोकांचे पैसे अडकलेही असतील, पण आम्ही हे जाणीवपूर्वक केलेलं नाही. लोकांनी माझ्या घराचे पत्रे काढून नेलेत. माझ्या घरावर दगड फेक केली. एकही नवा क्लायंट न घेता मी दर महिन्याला त्यांना पैसे दिले. माझ्या चांगल्या गोष्टी त्यांच्या लक्षात नाहीत. मी कित्येकांना मदत केली, त्याचं त्यांना काहीही नाही. माझ्यापेक्षा किती तरी मोठी धेंड आहेत, त्यांच्याविरोधात तुम्ही बोलणार नाही. मला पळून जायचं असतं तर दोन कोटी रुपयांत कसाही चार पाच वर्षे जगू शकलो असतो. पण आता मी कशाला दुबईला जाऊ, काय लॉजिक आहे त्यामागे? उलट आज संध्याकाळपर्यंत जाऊन पोलिसात हजर होईन. मी कुणाचाही पैसा बुडवणार नाही. भीक मागून पैसे फेडेण पण एकाचाही पैसा अडकणार नाही, हे खात्रीनं सांगतो. जे घडलं ते जाणीवपूर्वक केलेलं नाही, तसं असतं तर मी इतका मूर्ख नाही, असंही फटे यानं आपली बाजू मांडताना म्हटलं आहे.

कुटुंबाचं याच्याशी काहीही देणघेणं नाही, त्यांना त्रास देऊ नका

माझ्या कुटुंबाचं याच्याशी काहीही देणघेणं नव्हतं. तुम्हाला शेअर मार्केटचं जेवढी माहिती आहे, त्यांनाही तेवढीच माहिती आहे. आपला मुलगा काय करतोय, त्यांना काहीही माहिती नव्हतं. गरज नसताना त्यांनी आपल्या म्हातारपणातील दिवस उगाच जेलमध्ये घालवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळं गुंतवणूकदारांनी याचा विचार करावा, असं आवाहनही फटे यानं केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: मुंबईत २९ दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी; दिवाळीपूर्वी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

French PM Resigns: फ्रान्सची राजकीय अस्थिरता शिगेला! मंत्रिमंडळ नेमलं, पण पंतप्रधानांचा काही तासांत राजीनामा

Vijay Wadettiwar: ''काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर...'', जरांगेंना उत्तर देताना वडेट्टीवारांचं मोठं विधान

Pune Traffic Police : मोशीत वाहतूक पोलिसाला मारहाण करणारे दोघे अटकेत; सिग्नल तोडल्याचे छायाचित्र काढल्याने वाद

SCROLL FOR NEXT