Prakash Ambedkar On Vishalgad Encroachment Esakal
महाराष्ट्र बातम्या

Vishalgad Encroachment: "विशाळगडावर भिडेंच्या धारकऱ्यांचा धुडगूस," प्रकाश आंबेडकरांच्या आरोपामुळे खळबळ

Prakash Ambedkar: "विशाळगडावर अतिक्रमण झाले हे खेर आहे. पण अतिक्रमण हटवताना शासनाने त्या लोकांचे पुनर्वसन करावे लागते असा नियम आहे."

आशुतोष मसगौंडे

राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, रविवारी संभाजीराजे यांच्या आंदोलनापूर्वी विशाळगड परिसरात हिंसाचार झाला. यामध्ये स्थानिकांचे मोठे नुकसान झाला. यानंतर संभाजीराजे यांच्यासह 500 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

अशात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजन आरोप करत विशाळगडावरील हिंसाचारामागे संभाजी भिडे यांच्या धारकरी असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

काय म्हणाले आंबेडकर?

दरम्यान विशाळगडावर हिंसाचार झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे या विषयावर पत्रकारांसमोर आपली मते मांडली. आंबेडकर म्हणाले, "विशाळगडावर अतिक्रमण झाले हे खेर आहे. पण अतिक्रमण हटवताना शासनाने त्या लोकांचे पुनर्वसन करावे लागते असा नियम आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे आंदोलन करत असताना आमच्या माहितीप्रमाणे संभाजी भिडे यांचे सैन्य म्हणजेच धारकऱ्यांनी धुडगूस घातला अशी आमची माहीत आहे. आणि जाणून बुजून तिथल्या लोकांना मारझोड करण्यात आली त्यांची दुकाने तोडली."

विशाळगडावर रविवारी काय झाले?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला विशालगड किल्ला गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गडावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी विशालगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत सोमवारी त्यांनी आपल्या समर्थकांना चलो विशालगडचा नारा दिला होता.

पण संभाजीराजे विशाळगडावर पोहचण्यापूर्वीच तेथिल परिसरात हिंसाचार झाला. तेथिल घरे आणि दुकाणांची जाळपोळ झाली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी तणाव निर्माण झाला होता.

यानंतर काल शाहुवाडी पोलिसांनी संभाजीराजे यांच्यासह 500 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

इम्तियाज जलील यांची संभाजीराजेंवर टीका

दरम्यान, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे इम्तियाज जलील यांनी मोर्चाचे नेतृत्व केल्याबद्दल संभाजीराजे छत्रपतींवर निशाणा साधला. ते म्हणाले, "मुस्लिमांनी तुम्हाला मतदान केल्यामुळे तुम्ही दिल्लीला जाऊ शकला. आम्ही तुमचा आदर केला, पण तुम्ही विशालगड किल्ल्यावर हिंसक आंदोलनाचे नेतृत्व केले, म्हणून आम्हाला आश्चर्य वाटते की तुम्ही खरेच शाहू महाराजांचे वंशज आहात का?"

अतिक्रमणविरोधी मोहिमेत कायदेशीर प्रक्रिया पाळली जात नसल्याचा आरोप यावेळी जलील यांनी केला. लोकांच्या घरांची तोडफोड आणि वाहने जाळण्यात आली. यावेळी त्यांनी विचारले, महाराष्ट्रात जंगलराज आहे का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT