Vishwajeet Kadam Esakal
महाराष्ट्र बातम्या

Vishwajeet Kadam: विश्वजीत कदमसुद्धा काँग्रेस सोडणार? अशोक चव्हाणांसोबत ११ आमदार! BJP ऐवजी अजित पवारांच्या पक्षाचा ऑप्शन खुला

Ashok Chavhan: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्यासोबतच अनेय काही नेते देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आता भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा रंगलीय. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे (Congress) काही आमदार सुद्धा भाजपच्या गळाला लागले आहेत. जर अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर 15 आमदार घेऊन यावे, अशी अट भाजपकडून ठेवण्यात आल्याची चर्चा असतानाच काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांचं नाव आता चर्चेत आलं आहे..

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण, विश्वजीत कदम पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागलीय. त्याचसोबतच ५-६ आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा रंगली आहे. हिरामण खोसकर, सुलभा खोडके, अस्लम शेख, अमीन पटेल यांच्यासह अन्य काही आमदारांची नावे चर्चेत आली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठ खंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वी अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार का? या चर्चेवर विश्वजीत कदम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, 'काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील कोणीही भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं मी पुन्हा यावर वक्तव्य करणं अपेक्षित नाही, आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. माजी मंत्री अशोक चव्हाण असतील किंवा इतर नेते असतील त्यांच्या बाबतीत माध्यमात येणाऱ्या बातम्यांबाबत थोरात यांनी वक्तव्य केलं आहे, त्यामुळं त्यावर आता मी बोलू इच्छित नाही,' असंही कदम यांनी म्हटलं होतं.

मागच्या आठवड्यातच अशोक चव्हाण यांनी घेतली केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांची भेट

मागच्या आठवड्यातच अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. आपला पक्ष प्रवेश केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत व्हावा असे त्यांनी या भेटीत सांगितल्याची माहिती साम टिव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. अमित शहा 15 तारीखेला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत याच दरम्यान अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

Bajaj Best Mileage Bikes : मार्केटमध्ये एक दमदार बाईक! 100 कि.मी. मायलेज अन् 91 हजार किंमत, पेट्रोलचं टेन्शन दूर

TasteAtlas च्या जगातील सर्वोत्तम कोळंबी पदार्थांच्या यादीत 'चिंग्री मलाई करी'; जाणून घ्या या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचा रंजक इतिहास

ENG vs NZ: लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय; WTC Points Table मध्येही उलथापालथ; पाहा कोण कोणत्या स्थानी

Murud Crime: मुरुडमध्ये गोमांससदृश मटण विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT