महाराष्ट्र बातम्या

Coronavirus: मंत्रालयात अभ्यागतांना बंदी; अधिकाऱ्यांच्या बैठकांनाही लागणार चाप

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - जगभर थैमान घातलेल्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंत्रालयात अभ्यागतांना बंदी घालण्यात आली आहे, तर अधिकाऱ्यांच्या बैठकांनाही चाप लावण्यात आला आहे. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठका घेण्याबाबत आरोग्य तसेच गृहविभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे. राजभवन देखील पुढील अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मंत्रालयात प्रतिबंधात्मक योजनेचा भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी दररोजचे पास बंद करण्यात आले आहेत. त्याच बरोबर मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडे येणाऱ्या महत्त्वाच्या केवळ १० व्यक्‍तींना, तर मुख्य सचिव तसेच प्रधान सचिव यांच्याकडे येणाऱ्या फक्त पाच व्यक्‍तींना दर दिवशी प्राथमिक वैद्यकीय तपासणी करूनच प्रवेश देण्यात येणार आहे. ही तपासणी विमानतळावरील वैद्यकीय तपासणीप्रमाणे असणार आहे.

क्षेत्रीय कार्यालयातून दैनंदिन कामकाजासाठी येणारे अधिकारी, कर्मचारी यांनाही यापुढे मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच गृह विभागामार्फत ज्या सरकारी अधिकारी, अशासकीय अधिकारी अशा व्यक्‍तीपैकी ज्यांचे कार्यालय मंत्रालय इमारतीत आहे, अशाच व्यक्‍तींना सदर तात्पुरत्या प्रवेश पासच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे. अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे ई-मेलच्या माध्यमातून पोहचविण्यात यावेत. तसेच प्रवेश द्वारावरच खिडक्‍यांची व्यवस्था करावी. सर्व मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव, विभागीय सचिव यांनी त्यांच्या मंत्रालयात होणाऱ्या बैठका तातडीचे असेल तरच आवश्‍यकतेनुसार आयोजित कराव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

‘धुरंधर 2’ ची एंट्री अन् मिम्सचा जल्लोष! सोशल मीडियावर भन्नाट रिअ‍ॅक्शन व्हायरल

CET Cell Exam: सीईटी परिक्षेत मोठा बदल, यंदा विद्यार्थ्यांना दोन हॉल तिकीटं मिळणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; प्रशासनाचे दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT