Warkari Video Sakal
महाराष्ट्र बातम्या

Video : विठ्ठलाला भेटण्याची आस अन् टाळ मृदंगाचा ताल; वारकरी भक्तीरसात तल्लीन

वारकऱ्यांना आता विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Aashadhi wari 2023 : आषाढी एकादशी आता चार दिवसांवर आली असून वारकऱ्यांच्या सगळ्या दिंड्या आणि पालख्या पंढरपुरापासून हाकेच्या अंतरावर पोहोचल्या आहेत. सर्व वैष्णवांना त्या विटेवर उभा राहिलेल्या सावळ्या विठ्ठलाला डोळे भरून पाहण्याची आणि भेटण्याची आस लागलीये.

टाळ अन् मृदंगाच्या तालावर सगळेजण पायी चालत पंढरीकडे प्रस्थान करतात. जशीजशी पंढरी जवळ येत आहे तसतसा वेगळाच संचार वारकऱ्यांच्या अंगात संचारत आहे. कुणी दिंड्यामध्ये तर कुणी माऊलींच्या, तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सामील होत पंढरीकडे येतंय. या पालखी सोहळ्यातील वेगळेपण आणि आनंदाचा क्षण म्हणजे रिंगण सोहळा.

रिंगणाचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी सगळ्यांना आतुरता असते. रिंगण सोहळ्यामध्ये गायन, भजन, फुगड्या, किर्तन, प्रवचन अन् भजनात सगळेच तल्लीन होत असतात. असा हा वेष्णवांचा मेळा आता लवकरच पंढरीत दाखल होणार आहे. विठ्ठलाला भेटण्याची आस वारकऱ्यांना शांत बसू देत नाहीये. त्यांचा ओसंडून वाहणारा आनंद सदर व्हिडिओमध्ये दिसत आहे.

स्वप्नील मोरे आणि त्यांची टीम व्हर्चुअर वारीच्या माध्यमातून वारी जगभर पोहोचण्यासाठी मागच्या १३ वर्षापासून प्रयत्न करत आहे. व्हर्चुअल दिंडीच्या इंस्टाग्रामवर वारकऱ्याचा हा गोड व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT