minister anil parab first reaction After 11 hours of ED interrogation maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Andheri By-Elections: प्रचार संपला, 'NOTA' गेम सुरु! ठाकरे गटाने केला गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी इव्हीएमवरचा नोटा (NOTA) पर्याय निवडण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मंगळवारी केला. पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता जो सायंकाळी ५ वाजता संपला. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी हा आरोप केला आहे.

उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले की, त्यांच्या पक्षाने हा मुद्दा निवडणूक आयोगाबरोबरच पोलिसांकडेही उचलला आहे. तसेच आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीतही याचा प्रभाव पडेल, कारण पहिल्यांदाच महाविकास आघाडीची (एमव्हीए) एकत्रित ताकद दिसून येणार आहे. MVA मध्ये उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. यावेळी निवडणुकीत मतदानाच्या वेळा नोटा हा पर्याय निवडण्यासाठी लोकांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

माजी मंत्री परब पुढे म्हणाले की त्यांच्या पक्षाकडे अशा कृत्यांच्या व्हिडिओ क्लिप आहेत ज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे कथित कार्यकर्ते दिसत आहेत. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी आमदार रमेश लटके यांच्या पत्नी रुतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाल्याने या पोटनिवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

तर भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती, पण नंतर पक्षाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवारी मागे घेतली. एकीकडे, मृत आमदाराच्या कुटुंबातील सदस्याविरुद्ध उमेदवार न देण्याच्या परंपरेचा आदर करतो, असे सांगत भाजपने आपला उमेदवार मागे घेतला, असे परब म्हणाले. तर दुसरीकडे लोकांना नोटांसाठी मतदान करण्यास सांगितले जात आहे असे ते म्हणाले आहेत.

लटके यांना 98-99 टक्के मते मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि पतीच्या निधनामुळे अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणार असल्याचे परब म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT