human chain voting.png
human chain voting.png 
महाराष्ट्र

Video : मानवी साखळीतून नेमकं काय सांगायचयं या चिमुकल्यांना?

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा

चांदवड : चांदवड-देवळा विधासभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता.१५) येथील श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थी व पालकांना मतदानाविषयी जनजागृतीचे आवाहन केले. यावेळी प्राथमिक शाळेच्या पटांगणावर सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी मानवी साखळीने "ईसीआय (इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया) मतदान करा ११८ चांदवड विधानसभा' अशी अक्षरे तयार करुन मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचा संदेश दिला.

यावेळी प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदिप पाटील, चांदवडचे गटशिक्षणाधिकारी श्रीधर देवरे, नेमिनाथ संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर, मुख्याध्यापिका जयश्री गोळेचा, केंद्रप्रमुख डी. के. शिंदे, महाले, विषयतज्ज्ञ हिरामण जाधव, कलाशिक्षक के. व्ही. आहिरे आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करुन मतदान करण्याचा दिलेल्या संदेशाचे ड्रोनच्या सहाय्याने टिपलेले छायाचित्र(छायाचित्र: स्वप्नील शेलार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT