Manoj Jarange Patil Wagholi Sabha Pune esakal
महाराष्ट्र बातम्या

अंगावर गोळ्या झाडल्या तरी, OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण घेणार; वाघोलीत मनोज जरांगेंचा स्पष्ट इशारा

देव आले तरी मराठ्यांना (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण देण्याशिवाय आता कोणी रोखू शकणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

मराठे वादळ कसे आहे हे आता मुंबईत कळेल. ज्यांनी सोसले त्यांनाच कळते आरक्षण का गरजेचे आहे.

वाघोली : देव आले तरी मराठ्यांना (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण देण्याशिवाय आता कोणी रोखू शकणार नाही. 70 वर्ष मराठे आपल्या हक्कापासून दूर राहिले. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. गोळ्या झाडल्या तरी चालतील. पण, आरक्षण घेवूनच राहणार. मराठा वादळ काय आहे हे आता मुंबईत कळेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी वाघोलीत (Wagholi Pune) पहाटे 4.30 वाजता झालेल्या सभेत दिला.

भर कडाक्याच्या थंडीत सभेला हजारोंची उपस्थिती होती. रांजणगाव येथील मुक्कामानंतर 4.20 मिनिटांनी जरांगे पाटील यांचे वाघोलीतील मुक्कामाच्या ठिकाणी आगमन झाले. मैदानात येताच त्यांनी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभेला सुरुवात केली.

जरांगे पुढे म्हणाले, सरकारला सांगत होतो मराठ्यांच्या नदी लागू नका. आरक्षणाचा अध्यादेश काढण्यासाठी सरकारला मुदत वाढ दिली. मात्र, त्यांनी चाल ढकल केली. ओबीसीतून आरक्षण हा मराठ्यांचा हक्क आहे. तो मिळवणारच. कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर सापडल्या. एवढ्या नोंदी असूनही मराठ्यांना आरक्षण नाही आणि ज्यांची कोणतीही नोंद नाही त्यांना आरक्षण दिले.

नोंदी सापडल्या असल्या तरी अजून प्रमाणपत्र दिले नाही. एकाची नोंद आढळली तरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरक्षण मिळाले पाहिजे. ही आमची मागणी आहे. मराठे वादळ कसे आहे हे आता मुंबईत कळेल. ज्यांनी सोसले त्यांनाच कळते आरक्षण का गरजेचे आहे. पुढच्या पिढीला तरी त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. आता नाही तर पुन्हा नाही. म्हणून आता माघार नाही. असे सांगत त्यांनी प्रत्येक मराठ्याने मुंबईत दाखल व्हावे, असे आवाहनही केले.

छगन भुजबळ यांच्यावर टीका

मी त्यांना बोलत नव्हतो. पण, त्यांनीच सुरुवात केली. ओबीसी व मराठा यांच्यात वाद घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आम्ही घडू दिले नाही. त्यांची लायकी पण नाही मराठ्यांच्या विरोधात बोलण्याची, अशी खरमरीत टीका जरांगेंनी भुजबळांवर केली.

मुंबईतील रस्त्यावर फक्त मराठे दिसतील

मराठा आता पेटून उठला आहे. आता फक्त आरक्षण एवढंच त्यांचा अजेंडा आहे. जीवाची बाजी लावून ते मुंबईला येत आहेत. मराठा ताकद काय आहे हे मुंबईला कळेल. केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर प्रत्येक राज्यातील मराठे मुंबईत दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जनताच माझी मायबाप

मी माझे कुटुंब बाजूला ठेवले आहे. आता जनताच माझी मायबाप आहे. मराठे आपला हक्क तर मिळवतीलच, मात्र ते ही शांततेच्या मार्गाने.

भर थंडीतही नागरिकांचा जोश

जरांगे पाटील यांची आतुरतेने नागरिक वाट पाहत होते. भर थंडीत ते पहाटे पर्यंत मैदानात बसून होते. त्यांचे मैदानात आगमन होताच नागरिकांनी घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT