mahavitaran 
महाराष्ट्र बातम्या

प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना लवकरच वीजजोड - प्राजक्त तनपुरे

सकाळवृत्तसेवा

राहुरी - भाजप सरकारच्या काळातील निष्क्रियतेमुळे ऊर्जा खात्याचा कारभार व यंत्रणा ठप्प आहे. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी बंद आहे. ज्या रोहित्रांवर भार कमी आहे, तेथे दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना नवीन वीजजोड देण्याचा सरकारचा विचार आहे, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी सांगितले.

राहुरी येथे तहसील कार्यालयात आज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरात मंत्री तनपुरे बोलत होते. 

तनपुरे म्हणाले, ‘‘जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी ऊर्जा खात्याशी संबंधित आहेत. जनता दरबारात आलेल्या सर्व अर्जांचा निपटारा करण्याचा प्रयत्न राहील. सरकारच्या विविध खात्यांतील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात. नागरिकांना लोकप्रतिनिधींकडे हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये.’’

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्जमाफी देताना सोपी, सुलभ व सुटसुटीत प्रक्रिया राबविली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या अधिवेशनात सुखद बातमी अपेक्षित आहे,  शेतकऱ्यांची दोन लाखांपुढील रकमेची कर्जमाफी सरकारच्या विचाराधीन आहे, असेही तनपुरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डीसीपींनी गुंडाला धो-धो धुतला! कल्याणच्या ‘सिंघम’ची धडक कारवाई; व्हिडीओ व्हायरल

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

SCROLL FOR NEXT