Loksabha Election 2024 Esakal
महाराष्ट्र बातम्या

लोकसभेचा निकाल घरी बसूनच पाहा! ‘या’ संकेतस्थळावर पहायला मिळेल प्रत्येक मतदारसंघाचा फेरीनिहाय निकाल

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांना देशातील कोणत्याही मतदारसंघाचा निकाल घरी बसून पाहाता येणार आहे. त्यासाठी votes.eci व result.eci.gov.in ही संकेतस्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शहरातील रामवाडी धान्य गोडावून येथे होणार आहे. गोडावूनच्या १०० मीटर अंतरावर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरातील जांबवीर चौकात स्पिकर लावण्यात येणार असून त्याठिकाणी थांबूनच लोकांना निकाल ऐकायला मिळणार आहे. लोकांनी विनाकारण शहरातील सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, विनापरवाना रॅली, मिरवणूक काढू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घरी बसूनच निकाल पहावा, असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.

डिपॉझिट वाचविण्यासाठी...

सोलापूर लोकसभेची निवडणूक २१ उमेदवारांनी लढविली असून माढ्याच्या निवडणुकीत ३२ उमेदवार होते. माढ्यात महाविकास आघाडीचे धैर्यशिल मोहिते पाटील यांच्याविरूद्ध भाजप महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात फाईट झाली आहे. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीच्या आमदार प्रणिती शिंदेविरूद्ध भाजप महायुतीचे आमदार राम सातपुते यांच्यात जोरदार लढत झाली आहे. पण, या दोन्ही मतदारसंघातील अन्य उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविण्यासाठी मतदारसंघातील एकूण वैध मताच्या एक षटांश मते पडणे अपेक्षित आहेत, अन्यथा त्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.

संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंद

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, ताडी विक्री दुकाने उद्या (ता. ४) मतमोजणी सुरू झाल्यापासून मतमोजणी पूर्ण होऊन निकाल लागेपर्यंत बंद राहणार आहेत. सर्वांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंतिध दुकानाविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे आदेश सोमवारी (ता. ३) काढले आहेत.

घरी बसून ‘येथे’ पाहाता येईल निकाल

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांना देशातील कोणत्याही मतदारसंघाचा निकाल घरी बसून पाहाता येणार आहे. त्यासाठी votes.eci व result.eci.gov.in ही संकेतस्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संकेतस्थळ उघडल्यानंतर त्याठिकाणी आपल्याला ज्या मतदारसंघाचा निकाल पाहायचा आहे, तो निवडल्यास फेरीनिहाय निकाल त्याठिकाणी दिसणार आहे. याशिवाय esakal आणि sarkarnama या लिंकवर देखील निकालासंबंधीच्या अपडेट बातम्या वाचता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT