ship sakal
महाराष्ट्र बातम्या

समुद्रातील खारट पाणी व कोणतेही सांडपाणी शुद्ध करून पिता येणार; डॉ. सोनगे यांना जलशुद्धीकरणाचे पेटंट

समुद्र, बोअरवेलचे अशुद्ध पाणी आणि विविध आस्थापनेतील सांडपाणी आता सहजपणे शुद्ध करणे शक्य होणार आहे. तसेच आर.ओ. प्लांटमधून बाहेर पडणारे ७० अशुद्ध पाणी देखील शुध्द करून पिण्यायोग्य करता येणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : समुद्र, बोअरवेलचे अशुद्ध पाणी आणि विविध आस्थापनेतील सांडपाणी आता सहजपणे शुद्ध करणे शक्य होणार आहे. तसेच आर.ओ. प्लांटमधून बाहेर पडणारे ७० अशुद्ध पाणी देखील शुध्द करून पिण्यायोग्य करता येणार आहे. त्यासाठी एन.के. ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीचे प्र. प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे यांनी ‘प्युरीफिकेशन ऑफ इंपोटेबल ॲण्ड वेस्ट वॉटर’ हे संशोधन केले आहे. त्याला भारतीय बौद्धिक संपदा विभागाकडून ‘जलशुध्दीकरणा’चा पेटंट देखील मिळाला आहे.

मराठवाडा, विदर्भात सौरऊर्जा मुबलक आहे, पण पाण्याचे दुर्भिक्ष मोठे आहे. तेथील सांडपाणी शुद्ध करून पिण्यायोग्य करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होवू शकतो. दुसरीकडे देशातील अनेक भागातील लोक आर्सेनिक व फ्लोराईड असे जड धातू जास्त असलेले धोकादायक अशुद्ध पाणी पितात. त्यातून हात-पाय वाकडे होणे, पोटाचे आजार, कर्करोग होण्याच्या समस्या देखील आढळतात. समुद्रकिनाऱ्यावरील लोकांना व जहाजावरून प्रवास करणाऱ्यांना समुद्रातील क्षारयुक्त पाणी उपलब्ध असूनही ते पिता येत नाही. त्याठिकाणी देखील हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.

भूगर्भातून पाणी उपसा करून ‘आरओ’ सयंत्रामधून शुध्द केले जाते. पण, त्यातील ७० टक्के पाणी सांडपाणी म्हणून फेकून द्यावे लागते. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. मात्र, या संशोधनामुळे पर्यावरणाची हानी थांबवता येणार आहे. कोणत्याही स्त्रोतातील अशुद्ध पाणी सौरऊर्जा, उष्णता व ऊर्जेचा किंवा इतर वाया जाणाऱ्या औष्णिक ऊर्जेचा वापर करून पाणी शुध्द करता येते, हे डॉ. सोनगे यांनी प्रयोगाअंती सिद्ध केले आहे.

जलशुद्धीकरणाचे असे आहे नवतंत्रज्ञान

  • - जहाज असो वा अन्य कोणत्याही उद्योगातील इंजिनमधून ३० टक्के ऊर्जा धुरावाटे बाहेर फेकली जाते. वाया जाणाऱ्या त्या ऊर्जेचा पुनर्वापर करून त्यावर अशुद्ध पाणी शुद्ध करता येणार आहे.

  • - कोणत्याही ऊर्जेचा वापर करून सर्वप्रथम हवा व पाण्याचे मिश्रण केले जाते. त्यामुळे हवेची आर्द्रता वाढते. त्याला पुन्हा थंड केल्यानंतर त्यातून शुद्ध पाणी मिळते.

  • - सौरउर्जेचा वापर करून देखील अशुद्ध किंवा सांडपाणी शुद्ध करणे शक्य आहे. पाण्यातील फ्लोराईड, आर्सेनिक असे जड धातू या तंत्रज्ञानातून काढून टाकता येतात. त्यामुळे कोणत्याही आजाराची शक्यता उद्‌भवत नाही.

  • - या संशोधनामुळे समुद्र किनारी राहणाऱ्यांना क्षारयुक्त पाणी शुद्ध करता येईल. पाणी टंचाई किंवा अशुद्ध पाणी असलेल्या भागातील लोकांना तेथील सांडपाणी शुद्ध करून पिण्यायोग्य पाणी देणे सहज शक्य होईल.

अशुद्ध, सांडपाणी शुद्ध करून पिण्यायोग्य बनविणारे तंत्रज्ञान

महाविद्यालयातील प्रयोगशाळेच्या माध्यमातून दीड ते दोन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर ‘प्युरीफिकेशन ऑफ इंपोटेबल ॲण्ड वेस्ट वॉटर’चे संशोधन पूर्ण केले आहे. या तंत्रज्ञनाच्या माध्यमातून अशुद्ध पाणी शुद्ध करून प्रत्येकाला पिण्यायोग्य पाणी मिळेल. जलशुद्धीकरणाचे पेटंट मिळाल्यानंतर आता पथदर्शी प्रकल्प तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

- डॉ. बी. के. सोनगे, प्र-प्राचार्य, ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT