khadakwasla.jpg 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात पावसाची उघडीप; विसर्ग बंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मोठी उसंत घेतली आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. आज (ता. १८) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हरियाणा आणि उत्तर राजस्थानकडे सरकले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा उत्तरेकडे सरकला असल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. पुढील काही दिवस ही उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे सर्वाधिक ९० मिलिमीटर, तर कोयना नवजा, शिरगाव येथे प्रत्येकी ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

शनिवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : 

कोकण : जव्हार, भिरा प्रत्येकी ४०, मालवण, सुधागड पाली प्रत्येकी ३०, मोखेडा, सावंतवाडी, मंडणगड, उल्हासनगर, माथेरान, माणगाव, वाडा, दोडामार्ग प्रत्येकी २०. 

मध्य महाराष्ट्र : अक्रणी ५०, तळोदा, पेठ, सुरगाणा, पौड प्रत्येकी ३०, ओझरखेडा, अक्कलकुवा, राधानगरी, गगणबावडा, हर्सुल प्रत्येकी २०, नवापूर, शाहूवाडी, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, गारगोटी, यावल, लोणावळा, दिंडोरी, शिरपूर, जावळी मेढा, माढा, खेड, चांदवड, बोधवड प्रत्येकी १०. 

विदर्भ : करंजालाड, नांदूरकाझी, बार्शी टाकळी प्रत्येकी २०, मुर्तिजापूर, नेर, बळापूर, अकोला प्रत्येकी १०. 

घाटमाथा : ताम्हिणी ९०, कोयना नवजा, शिरगाव प्रत्येकी ७०, आंबोणे, दावडी, डुंगरवाडी प्रत्येकी ५०, भिरा ४०, वळवण, भिवापूरी, शिरोटा, खोपोली, खंद प्रत्येकी २०. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT