Jitendra Awhad OBC Statement sakal media
महाराष्ट्र बातम्या

...आम्ही बहुजनांची बाजू घेतली की गुन्हेगार; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

ठाण्यातील एका बिल्डरची नोकरी विषयक जाहिरात त्यांनी शेअर केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्याचे गृहविकास मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचं एक ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका बिल्डरची नोकरीविषयक जाहिरात शेअर केली असून यातील एका निकषावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. ही पोस्ट करताना "हा जातीभेद नाही का? आणि आम्ही बहुजन समाजाची बाजू घेतली की गुन्हेगार" असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (we are guilty criminal when taken side of Bahujan community Jitendra Awhad post viral)

आव्हाड यांनी शेअर केलेली जाहिरात 'आराधना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स' या ठाणे येथील बांधकाम कंपनीची आहे. या जाहिरातीमध्ये महिलांसाठी असलेल्या 'सेल्स आणि मार्केटिंग' या पदासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या पदासाठी सहा निकष निश्चित करण्यात आले आहेत. यांपैकी एका निकषामध्ये ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलं आहे. नेमक्या याच मुद्द्यावर आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे.

जाहिरात शेअर करताना त्यातील ब्राह्मण समाजातील उमेदवाराला प्राधान्य हा मुद्दा आधोरेखित करत हा जातीभेद नाही का? असा सवाल केला आहे. तसेच आम्ही बहुजन समाजाची बाजू घेतली की आम्ही गुन्हेगार! अशा शब्दांत त्यांनी टिकाकारांना उत्तर दिलं आहे. आव्हाडांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टला अनेकांनी प्रतिसाद दिला असून अनेक कमेंटही आल्या आहेत. अनेकांनी ही पोस्ट रिट्विटही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal protests : नेपाळमधील आंदोलनाचे सीमेवर पडसाद; परिस्थिती तणावपूर्ण भारतीय पर्यटकांना रोखलं

भाईजानचा नवा लूक पाहिला का? ‘बॅटल ऑफ गलवान’ची शूटिंग सुरू, सेटवरून शेअर केला पहिला फोटो

महापालिका पीओपी अज्ञातस्थळी साठवणार! गणेशोत्सवातील निर्माल्यापासून सेंद्रिय खत बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Latest Marathi News Live Updates: गोकुळ दूध उत्पादक संघाची सभा प्रचंड गदारोळात संपन्न

Navratri Festival : नवरात्रोत्सवासाठी मातीचे घट तयार, पण कुंभार बांधव संकटात; वाखारीत साहित्याचा तुटवडा

SCROLL FOR NEXT