Rahul Gandhi on PM Modi sakal
महाराष्ट्र बातम्या

Karnataka Election: 'आम्ही राहुल गांधींकडे पंतप्रधान म्हणून पाहतोय', कर्नाटकात काँग्रेसने आघाडी मिळवताच बड्या नेत्याचं वक्तव्य

भाजपा लोकशाही न मानणारा पक्ष आहे, त्यामुळे यंदा जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. समोर आलेल्या माहितीनुसार आता काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. अशातच भाजपच्या आकडेवारीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. जनतेने भाजपला वाळीत टाकल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही राहुल गांधींकडे पंतप्रधान म्हणून पाहतोय, असंही नाना पटोलेंनी म्हंटलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलताना म्हणाले कि, "मागच्या वर्षी सुध्दा आम्हाला काठावर बहुमत मिळालं होतं. भाजपचा खरा चेहरा भ्रष्टाचारी आहे हे जनतेच्या समोर आलं आहे. भाजप लिंगायत समाजाच्या जोरावर निवडून आलं आणि त्यांना वाळीत टाकण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांना तिथल्या जनतेने वाळीत टाकलं आहे.", असं नाना पटोले म्हणाले आहेत.

आम्ही राहुल गांधीकडे पंतप्रधान म्हणून पाहतोय

कर्नाटकमध्ये 124 च्या वर जागा सुशिक्षित मतदारांनी काँग्रेसला दिल्यात. याहुनही जास्त जागा काँग्रेसला येतील. राहुल गांधीवर खोटा आरोप लावून त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचे पाप भाजपने केलं आहे. त्यांना बेघर केलं आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे. राहुल गांधीकडे आम्ही पंतप्रधान म्हणून पाहतोय. राहुल गांधी शिकलेले आहेत आत्ताचे पंतप्रधान किती शिकले मला माहित नाही, असंही पटोलेंनी म्हणालेत.

आता समोर आलेले कल पाहता काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजप पिछाडीवर असल्याचं दिसुन येत आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजप काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.

काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

कर्नाटकात भाजपसह काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेस कंबर कसत आहे. सध्या मतमोजीणी सुरु असून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे.

घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावंल आहे. नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पण कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल पक्षासह देशभरात उपस्थित होत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी संकटमोचक ठरलेले डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या चुरस पाहायला मिळत आहे. सिद्धरामय्या हे माजी मुख्यमंत्री आहेत.

निवडून आलेल्या नेत्यांना आमदारांना एकत्र करण्याची तयारी सुरू झाली आहे. तशाच हालचाली भाजपकडून सुरू झाल्या आहेत. किंगमेकर असणाऱ्या जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी भाजपच्या केंद्रीय नेत्यानी चर्चा आणि बैठका सुरू केल्या आहेत. तर काँग्रेसचेही काही नेते जेडीएसच्या संपर्कात आहेत. बहुमताचा आकडा सातत्याने बदलत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून मोठ्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT