Prakash Ambedkar, Sonia Gandhi and Sharad Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : काँग्रेस-राष्ट्रवादी राजकारणातही अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांची टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - देशात भाजपशी दोन हात करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली. या आघाडीमध्ये देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा समावेश आहे. मात्र महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी विरोधकांच्या आघाडीमध्ये सामील झालेली नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची उद्धव ठाकरे गटासोबत युती आहे. मात्र ते महाविकास आघाडीचा भाग नाही. हाच धागा पकडून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून म्हटलं की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राजकारणात अस्पश्यता पाळतात. आम्हाला केवळ समाजातच अस्पृश्य म्हणून वागलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणून वागवलं जात. सनातन धर्म मानणारे भाजप-आरएसएसचे प्रचारक असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळू लागले आहेत.

दरम्यान आबंडेकर पुढं म्हणाले की, इंडिया आघाडीत आमंत्रणाची गरज नव्हती, तर मग तुम्ही इतर पक्षांना आमंत्रणे का पाठवत होते? लालू आणि स्टॅलिन, या शुद्रांमधील वजनदार समाजवादी नेत्यामुळे तुमची गाडी अडली नसती तर त्यांना तुम्ही आमंत्रित केलं असतं का? याबाबत मला शंका असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं.

काही दिवसांपूर्वीच मुंबईत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत २८ राजकीय पक्ष सामील झाले होते. मात्र महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT