Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: 'आम्ही नवाब शरीफ यांचा केक कापला नाही...', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर

नवाज शरीफ यांचा मुद्दा उकरून काढत संजय राऊत यांचा हल्लाबोल

अंकिता खाणे (Ankita Khane)

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत युती केल्यामुळे भाजपवर नेहमीच टीका करणारा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख यांची काल पाटण्यातील विरोधकांच्या ऐकीच्या बैठकीतच कोंडी झाल्याचं दिसून आलं. खुद्द मेहबुबा मुफ्ती यांच्याशेजारीच उद्धव ठाकरे यांना बसावं लागलं, त्यावरून महाराष्ट्रात भाजपने ठाकरेंविरेाधात रान उठवलं होतं. (Latest Marathi News)

यावर मेहबूबा मुफ्तीवरून टोमणे मारणारे उद्धव ठाकरे हे आज मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूला जाऊन बसले आहेत, अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांनी केलेल्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. (Latest Marathi News)

मेहबूबा मुफ्ती या विरोधकांच्या बैठकीला आल्या होत्या. ही बैठक पाटण्यात होती. जम्मू-काश्मीरमध्ये नाही. आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये गेलेलो नव्हतो, असं सांगतानाच आमच्याबद्दल बोलताना जपून. आम्ही काही नवाज शरीफ यांचा केक कापण्यासाठी गेलो नव्हतो, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.(Latest Marathi News)

तर पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले कि, 'आम्ही काय नवाब शरीफ यांचा केक कापला नाही? किंवा मुफ्तीच्या सरकारमध्ये गेलो नाही. ते तुमचंच भूत आहे. तुमचंच पाप आहे. तोंडाच्या वाफा उगाच दडवू नका. भविष्यात या विषयावर बोलूच. उद्धव ठाकरे त्यांना उत्तर देतीलच, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. मुफ्ती यांच्या मुद्द्यावरून आमच्याकडे बोट दाखवू नका. पाक व्याप्त काश्मीर भारताला जोडण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. ते कुठपर्यंत आलंय ते पाहा, असा चिमटा देखील राऊत यांनी फडणवीस यांना काढला आहे.(Latest Marathi News)

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशातील जवळपास १५ पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते आज पाटण्यात एकत्र आले होते. या बैठकीला अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, ममता बॅनर्जी, भगवंत मान प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, लालूप्रसाद यादव, ओमर अब्दुल्ला, महेबुबा मुफ्ती, हेमंत सोरेन व इतर प्रमुख नेते उपस्थित होते.(Latest Marathi News)

तर संजय राऊत यांनी मणिपूरच्या हिंसेवरून भाजपवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील टीका केली आहे. अमित शाह गृहमंत्री, लोहपुरुष असूनही मणिपूरचा हिंसाचार थांबवू शकले नाहीत. हे या सरकारचं अपयश आहे. मणिपूरबाबत पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. पण पंतप्रधान मोदी अमेरिकेत आहेत. देश जळतोय अन् मोदी अमेरिकेत आहेत, असंही त्यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT