महाराष्ट्र बातम्या

युतीबाबत आमचं ठरलं; इतरांनी तोंड घालू नये : उद्धव ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युतीबाबत ठरले आहे. इतर कोणीही यामध्ये तोंड घालू नये, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आता शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, असेही ते म्हणाले.

गिरीश महाजन यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री कोण होणार या विषयापेक्षा ज्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडवणे हे अधिक महत्वाचे आहे. 

सर्वसामान्यांसाठी शिवसेना सत्तेत

शेतकऱ्यांनी आपली सर्व दुःख बाजूला ठेऊन आपल्याला लोकसभेत निवडून दिले. त्यामुळे आता त्यांची दुःख दूर करणे हे आपले कर्तव्य असून, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी शिवसेना सत्तेत आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT