महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : इमारत बांधताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही; शरद पवारांची दुसरीच नाराजी

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरुन देशात राजकारण पेटलं आहे. सुरुवातीला राहुल गांधी यांनी भूमिका विषद केली होती. पंतप्रधानांनी इमारतीचं उद्घाटन करण्याऐवजी राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.

महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचं निमंत्रण नसल्याने विरोधकांनी आवाज उठवला आहे. विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसद भवन बांधतांना विश्वासात न घेतल्याचा आरोप केला आहे. पवार म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून संसदेचा सदस्य आहे. परंतु आम्हांला ही इमारत बांधणार असल्याचं वर्तमानपत्रातून कळलं. संसद भवन बांधतांना आम्हांला विश्वासात घेतलं नाही. याशिवाय भूमिपूजन करतांनाही कोणाला विश्वासात घेतलं नव्हतं, असं पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, संसदेच्या नवीन इमारतीचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करावं, हे त्यांनी मान्य केलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी कार्यक्रमाला न जाण्याची भूमिका घेतली. त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

यादरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. नितीश कुमार यांनी नवीन संसद भवन बांधण्याची गरज नव्हती, तसेच सरकारला इतिहास बदलायचा आहे असे म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, सुरूवातीला हे (संसद भवन) बांधले जात असल्याची चर्चा होत होती, तेव्हा देखील आम्हाला आवडलं नव्हतं. हा इतिहास आहे, स्वातंत्र्यानंतर गोष्टी ज्या ठिकाणी सुरू झाल्या त्या तेथेच विकसीत केल्या पाहिजेत. त्या वेगळ्या उभ्या करण्यात काही अर्थ नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT