kranti redkar facebook
महाराष्ट्र बातम्या

"आमचा विजय नक्की होणार"; राज्यपालांच्या भेटीनंतर क्रांतीला विश्वास

"राज्यपालांकडून लढण्याचं बळ मिळालं"

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आर्यन खान प्रकरणामुळं अडचणीत आलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपल्या कुटुंबियांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. "आमचा विजय नक्की आहे" असा विश्वास क्रांतीनं व्यक्त केला.

क्रांती म्हणाल्या, "आम्ही आता राज्यपालांना निवेदन दिलं आहे. आमच्यासोबत जे होत आहे ते सर्वकाही आम्ही राज्यपालांनी सांगितलं. आमची काही खूप मोठी तक्रार नाही पण सत्याची लढाई आहे. आम्ही आमचं रडणाणं गायला राज्यपालांकडे गेलो नव्हतो. आम्हाला ताकदीचं गरज आहे आणि राज्यपालांनी आम्हाला याबाबत आश्वासित केलं आहे. गरीब बिचारे सारखे इकडून तिकडे फिरत आहेत, अस जर कोणाला वाटतं असेल तर हे तसं नाही, आम्ही योद्धा आहोत. त्यामुळे आम्ही यापुढेही असेच लढत राहू"

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आम्हाला लढायला आणखी बळ मिळालं असून न्यायही नक्कीच मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या कुटुंबियांना टोमणे मारले जात आहेत. कुठलेही खोटे पुरावे दाखवून आमच्या अब्रूवर हल्ले केले जात आहेत, हेच आम्ही राज्यपालांना सांगितलं आहे, असंही क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नीरज डांगी यांची संसदेच्या राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे 'व्हिप' म्हणून नियुक्ती

Pune Crime : जनता वसाहतीत सराईत गुन्हेगारासह तिघे अल्पवयीन ताब्यात; १२ धारदार शस्त्रे जप्त

Pune Traffic: वाहतूक कोंडीत पुणे जगात पाचव्या क्रमांकावर; पुणेकरांचे किती तास रस्त्यावर जातात? शहरात वाहनांचा प्रतितास वेग किती?

VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीच्या निशाण्यावर आता कोणता विक्रम? जपानमध्ये ‘बेबी बॉस’ पुन्हा इतिहास रचणार?

Thane Fraud Arrest: ९३ लाखांच्या फसवणुकीतील फरार दोघे अप्पा बळवंत चौकातून अटकेत; पुणे वाहतूक पोलिसांची कारवाई, ठाणे पोलिसांकडे ताबा

SCROLL FOR NEXT