महाराष्ट्र बातम्या

लग्नात नाचला अन्‌ थेट रुग्णालयात पोचला 

नेत्वा धुरी

मुंबई - तीन वर्षांनी सूर्य पाहणाऱ्या 20 वर्षांच्या तरुणावर शरीरातील "ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे थेट रुग्णालयात दाखल होऊन शस्त्रक्रियेला सामोरे जाण्याची वेळ ओढवली. कॉल सेंटरमध्ये रात्रीचे काम करणाऱ्या तरुणाला सकाळच्या कोवळ्या उन्हाशी संपर्क तुटल्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. 

रात्री कॉल सेंटरमध्ये काम आणि दिवसभर घरात झोप, अशी दिनचर्या असलेला हा तरुण काही महिन्यांपूर्वी भावाच्या लग्नात मनसोक्त थिरकला; परंतु नाचतानाच अचानक आपली हाडे ठणकत असल्याचे त्याला जाणवले. हे दुखणे एवढे वाढले, की त्याला वर्सोवा येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करावे लागले. सतत रात्रपाळीत काम करणारा हा तरुण तब्बल तीन वर्षे सकाळच्या कोवळ्या उन्हाला पारखा झाला होता. परिणामी, त्याच्या शरीरातील "ड' जीवनसत्त्वाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याचे उघड झाले. 

भावाच्या लग्नात हा तरुण उत्साहाने नाचला; परंतु "ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडे मजबूत नसल्याने त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली. त्याच्या पाठीच्या कण्याला आधार देण्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे मणक्‍यांत स्क्रू बसवावा लागला. अपघातात मणक्‍यांना दुखापत झाल्यास अशा पद्धतीची शस्त्रक्रिया केली जाते. या तरुणाच्या शरीरात "ड' जीवनसत्त्व जवळपासच नव्हतेच. त्यामुळे त्याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली, असे रुग्णालयाच्या स्पाइन सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. विशाल पेशत्तीवार यांनी सांगितले. 

मुलांमधील कमतरतेत वाढ 
मुंबईतील तरुण आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये "ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेत वाढ होत आहे. लहान वयात हे जीवनसत्त्व औषधातून देणे योग्य नाही. त्यामुळे वाढत्या वयात मुले व तरुणांनी सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ घालवणे आवश्‍यक असते. मुंबईत असे रुग्ण वारंवार आढळत असतात, असेही काही डॉक्‍टरांनी सांगितले. 

काचेच्या इमारतींमुळे धोका 
आता मुंबईतील कॉर्पोरेट इमारती प्रामुख्याने काचेच्या असतात. या काचेच्या भिंतींमधून सूर्यप्रकाश आत येऊ शकत नाहीत. त्याचा शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. गगनचुंबी इमारतींमधील घरांत येणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाणही अत्यल्प असते. 

"ड' जीवनसत्त्व काय करते? 
- रक्तदाबावर नियंत्रण. 
- स्नायूंसाठी लाभदायक. 
- मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ 
- कार्यक्षमतेत सुधारणा. 

नव्या पिढीची बैठी जीवनशैली आणि ऑनलाइन कामांत व्यग्र राहण्यामुळे मैदानी खेळ जवळपास बंद झाले आहेत. शहरांतील गगनचुंबी इमारतींमुळे सूर्याचे कोवळे किरण मुंबईकरांना मिळतच नाहीत. त्यामुळे अनेक जणांमध्ये "ड' जीवनसत्त्वाची कमरतरता असल्याने औषधे द्यावी लागतात. 
- डॉ. विशाल पेशत्तीवार, विभागप्रमुख, स्पाइन सर्जरी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय, वर्सोवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

SCROLL FOR NEXT