anil deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

गडचिरोली पोलिसांची धाडसी मोहीम; गृहमंत्र्यांकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात अतिदुर्गम अबुझमाड जंगल परिसरात आज पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्रे तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. ४८ तासांहून अधिक काळ ही मोहीम सुरू होती. या मोहिमेत एक पोलिस जवान जखमी झाला.

विशेष अभियान पथकाचे (सी-६०) जवान महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील मुरुमभुशी गावाजवळील जंगलात गुरुवारी नक्षलविरोधी अभियान राबवत होते. त्यावेळी त्यांना या भागात काही संशयास्पद कारवाया दिसून आल्या. पोलिसांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. पोलिसांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याने जंगलाचा फायदा घेऊन नक्षलवाद्यांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात शोध मोहीम राबविली असता, त्यांना तेथील एका नक्षली कॅम्पमध्ये शस्त्रास्त्रे तयार करण्याचा कारखाना आढळून आला.

पोलिसांनी ही सारी यंत्रसामग्री उद्ध्वस्त केली. तेथून परतताना नक्षलवाद्यांनी पुन्हा पोलिस पथकावर गोळीबार केला. त्यालाही पोलिसांनी चोख उत्तर दिले. या परिसरात शस्त्रांचा कारखानाच आढळून आल्याने या भागात आणखी नक्षली दबा धरून बसले असल्याचा संशय बळावला होता. त्यामुळे आज परिसरात परत शोध घेण्यासाठी सी-६०चे जवान पाठविण्यात आले. त्यांच्यावर परत नक्षलवाद्यांनी हल्ला केला. परंतु पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान केले व हल्ला परतवून लागला. 

नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवानाच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले. शस्त्र कारखाना उद्ध्वस्त करण्यात यश मिळवल्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT