रजत पाटीदार कर्णधार, रिंकू सिंगकडे उप कर्णधारपद; मोठ्या स्पर्धेसाठी जाहीर झाला तगडा संघ... नेमक्या केव्हा होणार या लढती?

Rajat Patidar captain Central Zone Duleep Trophy 2026: रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली दुलीप ट्रॉफी २०२६ साठी मध्य विभागाचा दमदार संघ जाहीर करण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार आणि टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंग याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
Rajat Patidar captain Central Zone Duleep Trophy 2026

Rajat Patidar captain Central Zone Duleep Trophy 2026

Updated on

Central Zone squad for Duleep Trophy 2026: मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदार ( Rajat Patidar ) याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दोन पर्व आयपीएल जेतेपद पटकावले आणि आता तो दुलीप करंडक स्पर्धेत मध्य विभाग संघाच्या कर्णधारपदी दिसणार आहे. २३ ऑगस्टपासून ही स्पर्धा बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये खेळवण्यात येणार आहे. रजतने २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध भारतासाठी तीन कसोटी सामनेही खेळले आहेत. मध्य विभाग संघाचा उपकर्णधार म्हणून रिंकू सिंगची ( Rinku Singh ) निवड केली गेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com