Monsoon
Monsoon 
महाराष्ट्र

अरबी समुद्राकडे मॉन्सूनची चाल

सकाळवृत्तसेवा

पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी अरबी समुद्राच्या दक्षिण भागात असलेल्या मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मजल मारली आहे. तर, बंगालच्या उपसागरावरील मॉन्सूनच्या शाखेने आणखी वाटचाल करीत संपूर्ण अंदमान बेटसमूहांचा भाग व्यापला आहे. यंदा ६ जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचे पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तविले आहेत.

यंदा मॉन्सूनची अंदमानातील वाटचाल काहीशी अडखळतच झाली. मॉन्सून १८ जून रोजी अंदमान बेटांच्या दक्षिणेस असलेल्या निकोबार बेटांवर दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी वाऱ्यांनी प्रगती करत शनिवारी (ता. २५) थोडीशी चाल करत निकोबार बेटांचा संपूर्ण भाग व्यापून, उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. गेल्या पाच दिवसांपासून अंदमान बेटांच्या दक्षिणेत मुक्कामी असलेल्या मॉन्सूनने अखेर आज (ता. ३०) मोठी चाल केली आहे. संपूर्ण अंदमान व्यापून बंगालच्या उपसागराचा नैर्ऋत्य आणि पूर्व-मध्य भागापर्यंत मजल मारली आहे.

मॉन्सून यंदा नियमित वेळेच्या पाच दिवस उशिराने दाखल होण्याचे संकेत आहेत. तर गुरुवारी (ता. ३०) वाऱ्यांनी अरबी समुद्रातील मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे वाऱ्यांच्या देवभूमीवरील आगमानबाबत उत्सुकता वाढली आहे. भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या समुद्रावर ढगांनी दाटी करण्यास सुरवात केली आहे.

आजपासून पाऊस?
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेने कहर केला आहे. या उष्णतेने तामपानात कमालाची वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे जगातील उच्चांकी ४८.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. शुक्रवारपासून (ता. १) राज्यात वळवाचा पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

उष्णतेच्या लाटेमुळे ४३ अंश सेल्सिअसच्या वर गेलेली प्रमुख शहरे - मालेगाव, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT