Temperature 
महाराष्ट्र बातम्या

Weather Forecast : राज्यात अकोला सर्वात ‘हॉट’; तापमान ४५ अंशापार

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सर्वोष्ण शहरांच्या यादीत स्थान मिळविलेल्या अकोल्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सूर्य फणफणायला लागला असून, शनिवारी (ता.१३) राज्यात सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे.

तीव्र उन्हाळ्याची झळ आता जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून ४०-४२ दरम्यान असणारा पारा शनिवारी उसळला आणि राज्यात सर्वाधिक कमाल ४५.६ अंश सेल्सिअसची अकोल्यात नोंद झाली.

जगातील उष्ण शहरांमध्ये नावलौकिक मिळविलेल्या अकोल्यात आता ४० ते ४४ अंश सेल्सिअस तापमान सर्वसाधारण वाटू लागले असून, अकोलेकरांना तर, त्याची चांगलीच सवय झाली आहे. मात्र, पारा ४५ अंशापार गेल्यानंतर तिव्र उन्हाचे चटक्यांनी चांमडी सोलल्याशिवाय राहत नाही.

एरव्ही अकोल्यासह विदर्भात मार्चच्या सुरुवातीपासून तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागते. परंतु, यावर्षी अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे काही प्रमाणात तापमानात कमी जास्त बदल दिसून आला. मात्र, आठवडाभरापासून पारा चढायला सुरुवात झाली आणि शनिवारी (ता.१३) राज्यात सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअसची अकोल्यात नोंद झाली. अकोल्यातील तीव्र उन्हाळ्याची चाहूल खऱ्या अर्थाने आता जाणवालायला लागली असून, आठवडाभरात तापमान ४७ अंशापार जाण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तविण्यात आली आहे.

अकोला@ ४५.६

आठवडाभरापासून तापमानाचा जोर विदर्भात वाढत असून, शनिवारी (ता.१३) राज्यात सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोल्यात झाली. त्या खालोखाल अमरावती ४४.६, वर्धा ४४.१, यवतमाळ ४३, नागपूर, ४२.७ तर, चंद्रपूर येथे ४२.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT