उष्णतेची लाट esakal
महाराष्ट्र बातम्या

पुढील तीन ते चार दिवसांसाठी महाराष्ट्रात उष्णतेची लाट - IMD

पुढील तीन ते चार दिवसांसाठी महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार - IMD

सकाळ डिजिटल टीम

उष्णतेच्या लाटेचा प्रभाव (Summer) राज्यातील अनेक जिल्ह्यांत जाणवत आहे. राज्यातील कोकणसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या प्रदेशांत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने एंट्री केली. आता मात्र पुन्हा एकदा उष्णतेने लोक हैराण झाले आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांसाठी महाराष्ट्रात (Hot Wave in Maharashtra) उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं (IMD) दिला आहे. त्यामुळे या लाटेपासून सुरक्षित राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने मागील काही दिवसांपूर्वीही राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाण कोकणातील उष्णतेचा पारा ३६ अंशावर पोचला होता. दरम्यान, गेल्यावर्षी याच कालावधीत कोकणात कमाल पारा ३२ अंशांपर्यंत होता. परिणामी यंदाचा मार्च चांगलाच कडकडीत जाणार असल्याचे संकेत मिळाले होते. आता या लाटेमुळे पुन्हा एकदा नागरिकांना कडक उन्हाळ्याला समोरे जावे लागणार आहे. कोकणसह विदर्भ आणि मराठवाड्यातही उष्णतेच्या झळा वाढल्या आहेत.

दरम्यान, रणरणत्या उन्हामुळे नागरिकांनीही दुपारी घरीच बसणे पसंत केल्याने संबंध जिल्ह्यातील शहरातील मुख्य रस्त्यावर तुरळक वाहतूक पहायला मिळत आहे. उष्णतेची लाट अजून तीन चार दिवस राहणार असून महाराष्ट्रातील काही प्रदेशात याचा प्रभाव सर्वाधिक राहणार आहे. ऐन हंगामात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने हापूससह वायंगणी शेती संकटात आली आहे. आंबा, काजूसह कोकमाला फटका बसणार आहे. याशिवाय वाटण्यापेक्षाही थोडी मोठा आकार असलेली कैरी पिवळी पडून पडून जाते. हे मोठे नुकसान यंदा बागायतदाराला सहन करावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT