Weather sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather News : थंडी कमीच राहणार ‘हवामान’चा अंदाज; पाऊस कमीच

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) वतीने मंगळवारी (ता. ३१) नोव्हेंबर महिन्याचा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात ‘ऑक्टोबर हीट’मुळे हैराण झालेल्या नागिरकांना ऑक्टोबरच्या अखेरीस मात्र दिलासा मिळाला. कमाल व किमान तापमानात घट होत थंडीतही वाढ झाल्यामुळे उन्हाचे चटके आणि उकाड्यापासून सुटका झाली. मात्र, असे असले तरी नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) वतीने मंगळवारी (ता. ३१) नोव्हेंबर महिन्याचा अंदाज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये कमाल व किमान तापमानासह नोव्हेंबर महिन्यात देशातील पावसाची स्थिती कशी असेल याबाबत अंदाज देण्यात आला आहे. त्यानुसार यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे. किमान तापमानाबरोबर राज्यातील कमाल तापमानात सुद्धा सरासरीपेक्षा वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. तर देशात मध्य भारत आणि अति उत्तरेकडील भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत कमी नोंदले जाऊ शकते.

नोव्हेंबर महिन्याच्या काळात दक्षिण भारतातील राज्यात अधिक पाऊस पडतो. तर ‘आयएमडी’च्या १९७१ ते २०२० दरम्यानच्या दीर्घकालीन सरासरीनुसार दक्षिण भारतात नोव्हेंबर महिन्यात ११८.७ मिलिमीटर इतका पाऊस पडतो.

दरम्यान यंदा नोव्हेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज पाहता, दक्षिणेकडील बऱ्याच भागांसह, ईशान्य, पूर्व मध्य आणि पश्‍चिमेकडील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. उर्वरित देशात मात्र पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी असेल.

यंदा महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात ही सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला होता. तर आता नोव्हेंबर महिन्यात देखील अशीच स्थिती राहू शकते. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात नोव्हेंबरमध्ये ही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अशी असेल स्थिती

नोव्हेंबर महिन्यात देशात एल-निनो स्थिती कायम राहणार

सध्या समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान आणि वातावरणाच्या स्थितीमुळे एल-निनो स्थिती सामान्य

संपूर्ण देशात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता

कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होण्याचा अंदाज

इंडियन ओशन डायपोलची (आयोडी) स्थितीही सकारात्मक राहण्याची शक्यता

नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरी इतक्या पावसाची शक्यता

दक्षिण, वायव्य, ईशान्य, आणि पूर्व मध्य भारतातील बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

उत्तरेकडील हिमालयात अधिक बर्फवृष्टी/पाऊस अपेक्षित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठं अपडेट! अहवाल कधी येणार? पगारवाढ कधी? संसदेत सरकारने दिली माहिती

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेनंतर हिंदूत्ववादी संघटनांकडून मंचाचे शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजपवर निशाणा- हा तर दलितांचा अपमान

Ghatkopar Landslide Case: मुंबईतील मुक्काम ठरला अखेरचा! घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

Ghatkopar Landslide: भाच्यांना वाचवले, पण मुलाला गमावले; घाटकोपर दुर्घटनेत १६ वर्षीय मोहम्मदचा मृत्यू

Child Cancer: मुलांभोवती कर्करोगाचा विळखा घट्ट! चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोठा धोका; अन्य ‘सार्क’ देशांतील आजार वाढला

SCROLL FOR NEXT