Weather Update  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्यात एकीकडे अवकाळीचा कहर, तर दुसरीकडे उष्णतेचा अलर्ट; हवामान विभागाचा काय आहे अंदाज?

Weather Update : राज्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात गारपीट झाली असून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात गारपीट झाली असून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर दिसून येत आहे. आज राज्यात संमिश्र वातावरण असण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट झाली आहे. काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. यासाठी आज अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास वेग) हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि ठाण्यात आज दिवसभर उष्णतेची लाट असेल तर संध्याकाळच्या सुमारास हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, सोलापूर आणि बीडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्येही आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे शहर परिसरात पावसाने लावली हजेरी

दिवसभर प्रचंड उकाडा आणि सायंकाळी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाने जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी शहराच्या पूर्व भागासह बारामती, इंदापूर, हवेली, शिरूर, दौंड आदी तालुक्यांत वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस कोसळला. पुढील दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यात उकाड्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

वादळी पावसाच्या हजेरीबरोबरच जिल्ह्यातील कमाल तापमान पुन्हा वाढले आहे. अनेक ठिकाणी पारा ४१ अंशांच्या पार गेला आहे. तळेगाव ढमढेरे येथे सर्वाधिक म्हणजे ४३.१ अंश सेल्सिअस तापमान होते. पुणे शहरातील सरासरी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. बुधवारी दुपारी अचानक आकाश ढगाळ होत सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

जिल्ह्याच्या पूर्व भागात रात्री उशिरापर्यंत अवकाळी पावसाचे ढग दाटले होते. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानीची शक्यता आहे. बाष्पयुक्त हवा आणि वाढलेल्या तापमानामुळे गुरुवारी (ता. १८) जिल्ह्यात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ आणि अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवमान खात्याने दिली आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाटेचा (यलो अलर्ट) इशारा, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

इंदापुरातही मुसळधार

सायंकाळी बारामती तालुक्यावर ढगांनी गर्दी केली होती. त्यानंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. लगतच्या इंदापूर, फलटण, कर्जत आदी तालुक्यांतही वादळी पाऊस कोसळला. रात्री उशिरापर्यंत पावसाची हजेरी कायम होती. रात्री साडेनऊपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार बारामतीत सरासरी २०.५ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली.

जिल्ह्यातील अवकाळी पाऊस (मिलिमीटर)

वडगावशेरी ः १६

हवेली ः १

बारामती ः २०.५

पाषाण ः ०.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT