Weather Update
Weather Update Esakal
महाराष्ट्र

Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’; वाचा हवामान विभागाचा अंदाज

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे कमाल तापमानाचा पारा रविवारी झपाट्याने खाली आला. राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४२.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान, पुणे-मुंबईसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज (सोमवारी ता. २२) वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, विजांचा गडगडाट होईल, असा ‘यलो अलर्ट’ हवामान खात्याने रविवारी दिला आहे.

दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान असून, शनिवारी (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाने तडाखा दिला आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पावसासह आज (सोमवारी ता. २२) गारपीट होण्याचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. बीड, उस्मानाबाद, छ. संभाजीनगर, जळगाव यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह गारपिटीचाही शक्यता आहे. या भागांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

उष्ण व दमट हवामान

(यलो अलर्ट) : ठाणे, मुंबई, पुणे

वादळी पाऊस, गारपीट : अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ.

वादळी पाऊस : सोलापूर, धाराशिव, बीड लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT