Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : पुढील 24 तास महत्त्वाचे! या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Weather Update : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सक्रिय होऊ लागल्याने रविवारपासून (ता. २३) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'रेड अलर्ट' दिला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सक्रिय होऊ लागल्याने रविवारपासून (ता. २३) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'रेड अलर्ट' दिला आहे. दक्षिण कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे. विदर्भातही पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भासह मराठवाड्यात आज पावसाला सुरुवात झाली होती. ऊन- सावल्यांच्या खेळात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम होता. ढगाळ हवामान, पावसाच्या हजेरीने कमाल तापमान ३९ अंशांच्या खाली आहे. शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३८.७ अंश तापमानाची नोंद झाली. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

पुणे जिल्ह्यात उद्यापासून वाढणार पावसाचा जोर

शहर आणि जिल्ह्यात सोमवारपासून (ता. २४) मॉन्सून सक्रिय होणार असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील आठवडाभर तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत आहेत.

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शहरात दाखल झाल्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे पाहायला मिळाले. घाटमाथ्यावर अजूनही संततधार पावसाची प्रतीक्षा असून, जिल्ह्याच्या पूर्व भागातही जोरदार पावसाने ओढ दिली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात तरी शेतीयोग्य पाऊस पडेल, असा अंदाज आहे. शनिवारी शहरात दिवसभर ऊन-सावलीचा खेळ पाहायला मिळाला. रविवारी (ता. २३) आकाश सामान्यतः ढगाळ आणि दपारनंतर पावसाच्या सरी पहण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत

मराठवाड्यात पावसाची हजेरी

मराठवाड्यातील जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत हलका पाऊस पडला. तर यवतमाळ, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत मध्यम पाऊस पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev Kangana Ranaut : बाबा रामदेव यांचा कंगना रणौतवर पलटवार; म्हणाले, ‘अशा लोकांबद्दल टिप्पणी करायची नाही’

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

Sugar Rate : दिवाळीपर्यंत साखर शंभरी पार जाण्याची भीती; राज्यात १८ लाख टन साठा शिल्लक

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

माझी इच्छा नव्हती सुनीधीकडून गाऊन घ्यायची... अवधूत गुप्तेने सांगितली 'कांदे पोहे' गाण्याची कथा; मराठी अभिनेत्रीने आधीच गायलेलं गाणं

SCROLL FOR NEXT