Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update: राज्यात आजही वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Forecast: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांना तर गारपीटीने देखील तडाखा दिला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांना तर गारपीटीने देखील तडाखा दिला आहे. यामुळे फळबागा, आणि शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशातच पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आजपासून पुढील दोन दिवस नागपूरसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रात पुणे तसेच नगर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आज, सोमवारी मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. खानदेशात जळगाव व धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यात पावसाची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे.

उत्तर भारतात मुसळधार पावसासह गारपीट

उत्तर भारतातील अनेक भागांना रविवारी पावसाने हजेरी लावली. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला, तर काही भागांमध्ये गारपीट आणि विजांचा कडकडाटही झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT