Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना IMD कडून हायअलर्ट

Maharashtra Weather Update: राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि परिसरातील वातावरण आज ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

कोणत्या भागात पावसाची शक्यता?

धुळे, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये विशेषतः घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. तर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कड़कडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भ-मराठवाड्याला पावसाचा इशारा

विदर्भ-मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावर पाऊस होणार असल्याने काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, नाशिक धुळे आणि नंदुबार जिल्ह्यांत आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईसह उपनगरात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT