weather update effect of prolonged rain one per cent sowing in the state agriculture solapur  sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात एक टक्काच पेरणी

पाऊस लांबल्याचा परिणाम : बळीराजाची तिफण गोठ्यात; अठरा जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : बहुतेक धरणांनी आता तळ गाठला असून पाऊस लांबल्याने जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर खरीपाच्या क्षेत्रापैकी १७ जूनपर्यंत केवळ एक लाख ४७ हजार हेक्टरवर (एक टक्के) पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी १७ जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृणधान्याखालील क्षेत्र ३६ लाख ३७ हजार हेक्टरपर्यंत आहे. तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र ४१ लाख ५८ हजार हेक्टर तर कापसाचे क्षेत्र जवळपास ४२ लाख हेक्टरपर्यंत आहे.

मॉन्सूनच्या पावसाला ७ जूनपासून सुरवात होते, असे गृहित धरले जाते. त्यानुसार जूनअखेर दरवर्षी जवळपास ५४ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी होते. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने १७ जूनपर्यंत केवळ एक टक्का क्षेत्रावरच खरीप पिकांची पेरणी तथा लागवड झाली आहे. उजनी धरणासह राज्यातील बहुतेक धरणांनी तळ गाठला आहे. गेल्या वर्षी १७ जूनपर्यंत सरासरी १२०.४ मिलिमीटर पाऊस पडला होता. पण, यंदा जून महिन्यात ९० मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून पेरणी केलेल्या बियादेखील उगवलेल्या नाहीत. आता पाऊस पडल्याशिवाय बळीराजाची चिंता दूर होणार नाही, अशी स्थिती आहे.

जूनमध्ये कमी पाऊस पडलेले जिल्हे

नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत पेरणी खोळंबली आहे.

जमिनीत किमान ७५ मिलिमीटर ओलावा असल्याशिवाय शेतकऱ्यांनी बियाणांची पेरणीची घाई करू नये. पावसाची वाट पाहावी. तोपर्यंत जमिनीची मशागत करून घ्यावी

- बाळासाहेब शिंदे, कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft च्या सेवा ३६ तास ठप्प, आता हॅकर्सचा धोका; वापरकर्त्यांना २४ तासांसाठी इशारा... तुमच्यासोबतही असं घडू शकतं!

Ratnagiri Hapus Mango : आंब्याचा हंगाम सुरू! कोल्हापुरात रत्नागिरी हापूसची आवक; पहिला सौदा कधी होणार?

कोस्टल रोडची लांबी वाढणार, वर्सोवा ते दहिसरदरम्यान रस्त्याची रुंदी ४४ मीटरवर; मुंबई महापालिकेचा निर्णय

Pune News: दुबार वाटपाच्या जमिनींवर ;गुंजवणी प्रकल्पातील सहा हेक्टर जमिनीबाबत जिल्हा प्रशासनाची कारवाई

Jal Jeevan Mission : पुणे जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या वीजजोडणीअभावी बंद असलेल्या १६१ पाणीपुरवठा योजनांना दिलासा; ११ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT