weather update heat stroke patient Earth temperature rise constant changes in atmosphere mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्याला उष्माघाताचा विळखा

१७ मृत्यूंची नोंद; प्रत्येक जिल्ह्यात प्रतिबंधक कृतीयोजना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : यंदा राज्यात मार्च महिन्यापासूनच विक्रमी तापमानाची नोंद झाली. वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे. राज्यात दरवर्षी एक मार्च ते ३१ जुलै या काळात उष्णताविषयक विकारांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार ६ मे २०२२ पर्यंत एकूण ४६७ उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर जिल्हा मृत्यू अन्वेषण समितीने एकूण १७ मृत्यू निश्चित केले आहेत.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये उष्माघात मृत्यू अन्वेषण समिती नेमण्यात आली आहे. या समितीने रुग्णांची लक्षणे, रुग्णाला होणारे इतर आजार, रुग्णाने उन्हामध्ये काम करण्यासंदर्भातील माहिती आणि संबंधित ठिकाणचे तापमान, आर्द्रता या बाबी लक्षात घेऊन हे मृत्यू नोंदवले आहेत. त्यासह उष्णतेच्या लाटेमुळे होणारी जीवितहानी लक्षात घेता प्रत्येक जिल्‍ह्यात उष्णतेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी ‘हिट ॲक्शन प्लान’ अर्थात उष्मा प्रतिबंधक कृतियोजना आखली आहे.

राज्य तसेच जिल्हास्तरावर उष्णतेचे विविध विकार आणि त्यावरील उपचार याबाबत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सर्व जिल्ह्यांना या संदर्भातील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आवश्‍यक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

या व्यक्तींना अधिक धोका

उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक

वृद्ध आणि लहान मुले

स्थूल, पुरेशी झोप न झालेले लोक

गरोदर महिला

अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले रुग्ण, अपस्मार रुग्ण, दारूचे व्यसन असलेले नागरिक

मंडळनिहाय निश्चित मृत्यू

  • औरंगाबाद २

  • लातूर १

  • नाशिक ४

  • अकोला १

  • नागपूर ९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : कमीत कमी प्रदूषण अन् शक्य तितक्या पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू : मुख्यमंत्री फडणवीस

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT