Rain esakal
महाराष्ट्र बातम्या

येत्या 24 तासांत राज्यातील 'या' भागात मुसळधार; हवामानचा इशारा

आता पुन्हा एकदा येत्या २४ तासात या प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आता पुन्हा एकदा येत्या २४ तासात या प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या प्रदेशात पाऊस सुरु आहे. (Maharashtra Rain) गेले काही दिवस या भागातील ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम होत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा येत्या २४ तासात या प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (weather update in maharashtra)

दरम्यान, 34 अरेबियन सी म्हणजे लक्षव्दीप मालदीवजवळ चक्रीवादाळाच्या पट्ट्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. (heavy rain) या द्रोणीय भागामुळे आज राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणात याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे मुंबईसह (Mumbai) राज्यातील या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील पालघर, नंदुरबार धुळे या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून हा पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवहन केले आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गेले काही दिवस दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी राज्यातील काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही प्रदेशात येलो आणि काही भागात ओरेंज अर्लटचा हवामान खात्याने इशारा दिला होता. आता पुन्हा एकदा येत्या चोवीस तासात मुसळधार पावस होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT