weather update maharashtra chandrapur akola 3 day alert 46 degrees nagpur  sakal
महाराष्ट्र बातम्या

‘फ्राय’ डे चंद्रपूर, अकोला ३ दिवस ऑरेंज अलर्ट

विदर्भात आज सूर्यनारायणाने अक्षरशः रौद्ररूप धारण करत चांगलाच कहर केला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात आज सूर्यनारायणाने अक्षरशः रौद्ररूप धारण करत चांगलाच कहर केला. संपूर्ण विदर्भात उन्हाची भीषण लाट पसरली असून, नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये सूर्याचा तीव्र प्रकोप पाहायला मिळाला. शुक्रवारी चंद्रपूरच्या पाऱ्याने ४६.४ अंशांपर्यंत उच्चांकी झेप घेतली. नागपूरचाही पारा यंदाच्या मोसमात प्रथमच ४५ अंशांवर गेला. शनिवारपासून विदर्भात ऑरेंज अलर्ट असल्यामुळे तापमानाचा भडका आणखी उडण्याची शक्यता आहे. विदर्भासाठी शुक्रवारचा दिवस यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक ‘हॉट’ राहिला. गडचिरोलीचा अपवाद वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली.

लाटेचा सर्वाधिक प्रभाव चंद्रपूरमध्ये दिसून आला. येथील तापमानात चोवीस तासांमध्ये अर्ध्या अंशाची वाढ होऊन पारा विक्रमी ४६.४ अशांपर्यंत गेला. प्रादेशिक हवामान विभागाने येथे नोंद केलेले तापमान राज्यात सर्वाधिक, तर देशात बांदानंतर दुसरे सर्वाधिक आणि जगात पाचव्या क्रमांकावर राहिले. नागपूरच्याही तापमानाने यंदाच्या मोसमात उच्चांकी झेप घेतली. शुक्रवारी शहराचे कमाल तापमान प्रथमच ४५.२ अंशांवर गेले. याशिवाय ब्रम्हपुरी, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ येथेही उन्हाचा तडाखा जाणवला. पाचही जिल्ह्यांमध्ये ४५ च्या वर तापमानाची नोंद करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, जगातील पहिल्या १३ उष्ण शहरांमध्ये विदर्भातील चार शहरांचा समावेश आहे. केवळ गडचिरोली आणि बुलडाणा येथेच पारा ४३च्या खाली राहिला.

उन्हाच्या चटक्यांमुळे सध्या विदर्भावासी कमालीचे हैराण असून, उष्माघाताचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शिवाय रस्त्यांवरील गर्दीही कमी झाली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिल्याने उन्हाचे चटके आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागासह स्थानिक प्रशासनानेही नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे.

उन्हाचा तडाखा

ठिकाण - तापमान

चंद्रपूर ४६.४

नागपूर ४५.२

ब्रह्मपुरी ४५.६

वर्धा ४५.५

अमरावती ४५.०

अकोला ४५.८

यवतमाळ ४५.२

वाशीम ४३.५

गोंदिया ४३.८

बुलडाणा ४२.८

नगर ४४

मालेगाव ४३.६

जळगाव ४४.६

पुणे ४१

सोलापूर ४३

औरंगाबाद ४२

नांदेड ४३

परभणी ४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT