Weather Update maharashtra sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : वादळी पाऊस, गारपिटीने कंबरडे मोडले

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये पुन्हा वादळी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बुधवारी (ता.२६) वादळी वारे आणि पावसाने पुन्हा तडाखा दिला. गुरुवारी (ता. २७) देखील दुपारनंतर विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली. सततच्या पावसाने कांदा, ज्वारी, मका, सोयाबीन, हळद, केळी, आंबा, कलिंगड, पपईसह उन्हाळी पिके, भाजीपाला, फळपिकांची नासाडी झाली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने गारपीट सुरू असल्याने बळिराजाते पुरते कंबरडे मोडले आहे.

परभणी-हिंगोली जिल्ह्यात वादळी वारे, मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, तसेच अनेक मंडलात गारपीट झाली. परभणी जिल्ह्यात वीज कोसळून २ ठार आणि तीनजण जखमी झाले. तर ४२ जनावरे दगावली. सततच्या पावसाने उशिरा पेरणी केलेली रब्बी ज्वारी, हळद, केळी, आंबा, कांदा, भाजीपाला पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पालम,पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलात पावसाचा जोर होता. हिंगोली,कळमनुरी,औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यात गारपीट झाली.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात वावी परिसरात बुधवारी (ता.२६) प्रचंड वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. कमी अधिक प्रमाणावर गाराही पडल्या. पावसाने कांदा, कलिंगड आदी पिकांना फटका बसला. नगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी पाऊस, गारपिटीने पिकांचे नुकसान सुरूच आहे. बुधवारी (ता. २६) शेवगाव, नेवासा, राहुरी, राहाता तालुक्यांतील वादळी पाऊस झाला.

वीज पडून चार जणांचे मृत्यू झाले. राहुरी तालुक्यात जोरदार वादळ व पावसाने घरांचे, पिकांचे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (ता. २६) दुपारी व रात्री वादळी वाऱ्यांसह गारपीट होऊन उन्हाळ्यात लागवड केलेली ज्वारी, सोयाबीन, कलिंगड, आंबा, केळी, पपई यांसारख्या पिकांचे नुकसान वाढले आहे. वीज पडून दोन व्यक्तीही दगावल्या.

खानदेशात वादळ, गारपिटीने पीक हानी सुरूच आहे. यातच बुधवारी (ता. २६) दुपारी व सायंकाळी जळगाव, धुळ्यातील अनेक भागांत गारपीट व वादळी पाऊस झाला. यात मका, केळी, बाजरी, ज्वारी आदी पिकांना मोठा फटका बसला. सोनाळे, पळसखेडा, जामनेर, पहूर भागात पावसाने केळी, मका, ज्वारीचे नुकसान झाले. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही पाऊस झाला.

राज्यभरातील स्थिती

  • परभणीत २ मृत्युमुखी,

  • ३ जखमी, ४२ जनावरे दगावली

  • सिन्नर तालुक्यात वादळी वारे, गारपीट

  • राहुरी, नेवासा, शेवगावात पावसाचा धुमाकूळ

  • नगर जिल्ह्यात वीज पडून चार मृत्यू

  • नांदेडमध्ये वादळी पाऊस, वीज पडून दोघांचा मृत्यू

  • खानदेशात पाऊस, गारपिटीने पिकांची हानी

केळी, कांद्याचे मोठे नुकसान

वादळी पाऊस आणि गारपिटीने गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भात हजेरी लावली. दुपारनंतर अनेक ठिकाणी पाऊस सुरूच होता. छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील बनोटी, वरठाण येथे गारपीट, तिडका शिवारात कांदा पिकाचे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी वादळी पाऊस झाला.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात जोरदार गारपीट झाली. खानदेशात वादळ, गारपिटीने पीकहानी सुरूच आहे. यातच बुधवारी (ता. २६) दुपारी व सायंकाळी जळगाव, धुळ्यातील अनेक भागांत गारपीट व वादळी पाऊस झाला. यात मका, केळी, बाजरी, ज्वारी आदी पिकांना मोठा फटका बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT