rain Maharashtra Weather forecast sakal
महाराष्ट्र बातम्या

मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता - IMD

सकाळ डिजिटल टीम

देशातील चार राज्यात पुढच्या ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई - उत्तरेकडील पश्‍चिमी चक्रावात, अरबी समुद्रातून होत असलेला बाष्प पुरवठा त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे, यांच्या प्रभावामुळे पुढील चार दिवस मध्य आणि वायव्य भारतात (India) पावसाची शक्यता आहे. यामुळे राज्यातही पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले असून पुढील दोन दिवस विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यात (Marathwada) विजांच्या कडकडाटासह पाऊस तर काही भागात गारा पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसात पावसाने हजेरी लावली तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. दरम्यान, सोमवारी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Weather update maharashtra rain in marathwada imd)

उत्तरेकडील पश्चिम चक्रावात आणि अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता यासह पुढील ४,५ दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यामुळे पावसाची शक्यता आहे. 9 ते 13 जानेवारी या कालावधीत मध्य पूर्वेकडील राज्यांसह व मध्य भारतात हलका-मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातही १० आणि ११ तारखेला मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारताला थंडीचा आणि पावसाचा दणका

देशातील अनेक भागात सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याचं दिसून येत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट असून मध्य आणि पूर्व भारतात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला असून यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाचे आर के जेनामनी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, उत्तरेकडील पश्चिम चक्रावाताच्या वाढत्या प्रभावामुळे मध्य भारत आणि पूर्वेकडील भागामध्ये मुसळधार पाऊस होईल. यामध्ये ओडिशा, झारखंड, बंगाल आणि बिहारचा समावेश आहे. ११ ते १३ जानेवारी या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रावातामुळे ११ जानेवारीपासून पूर्वेकडील भागात प्रभाव दिसण्याची शक्यता आहे.

चार राज्यांमध्ये पावसाची शक्यता

जेनामनी यांनी सांगितले की, ओडिशात ११ ते १२ जानेवारी या कालावधीत यलो अलर्ट आहे तर ११ जानेवारीला छत्तीसगढ, झारखंड, ओडिशात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तेलंगना आणि आंध्रप्रदेशातसुद्धा वीजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. याशिवाय उत्तर भारतात थंडीची लाट पसरेल असा इशारा दिला आहे. तर राजस्थान, हरयाणात दाट धुक्याची शक्यता वर्तवली आहे.

देशाच्या उत्तर भागातील पावसाबाबत हवामान विभागाने म्हटलं की, पश्चिम हिमालयाच्या भागासह आजुबाजुच्या प्रदेशात, राजस्थान, हरयाणा आणि पंबाजमध्ये १० तारखेपासून पावसाचे प्रमाण कमी होईल. शनिवारी पावसापासुन थोडा दिलासा मिळाला होता. मात्र पंजाबमध्ये पाऊस सुरुच होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

Marathi News Live Updates : राज्य मंडळाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावी ८ फेब्रुवारीपासून, तर दहावी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT