Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यात ऐन दिवाळीत बसरणार पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती

शुक्रवार म्हणजेच 10 नोव्हेंबरपर्यंत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

ऐन दिवाळी सणाच्या दरम्यान वातावरणात मोठे बदल दिसून येत आहेत. ऐन हिवाळ्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून देशासह राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दिवाळीमध्ये कधी उकाडा, कधी थंडी तर कधी पाऊस असं वातावरण दिसत आहे. तर काल (बुधवारी) कोकणासह अनेक भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये सध्या पाऊस हजेरी लावत आहे. शुक्रवार म्हणजेच 10 नोव्हेंबरपर्यंत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मात्र, शनिवारनंतर राज्यात सगळीकडेच हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर काल (बुधवारी) कोल्हापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुण्याच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.

आजही राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे शनिवारनंतर राज्यातील हवामान पूर्णपणे निरभ्र होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

ऐन खरीप हंगामामध्ये पिके काढणीला असताना अवकाळी पावसाचं संकट ओढवल्याने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. अशातच हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पुणे, कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT