Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: छत्र्या, रेनकोट तयार ठेवा..., राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांची तारांबळ

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर राज्यात आगामी दोन दिवसात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर पुणे शहर परिसरात मध्यम स्वरुपाचा, तर घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुणे शहरात काल (मंगळवारी ता. २६) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक पावसाच्या आगमनामुळे गणपती दर्शनाला आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर पाण साचले होती. यामुळे वाहनचालकांची दमछाक झाली होती. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

दरम्यान, पुढील चार दिवस पुणे शहर आणि परिसरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुणेकरांना अनंत चतुर्दशी दिवशीही पावसाची अनुभूती येणार आहे.

शहरात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असून, अधूनमधून उन्हाचे सावटही पाहायला मिळत आहे. मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असताना मात्र राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम शहरावरही होऊ लागला आहे.

पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांची तारांबळ

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडत आहे. मंगळवारी पुणे शहरात सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. ढगांची दाटी झाल्याने सायंकाळी साडेसातनंतर पावसाने जोर धरला. मुख्य पेठांसह उपनगरांमध्ये पाऊस पडला. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह पाऊस झाला. रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते. त्यामुळे नागरिकांची पळापळ झालीच, पण वाहनचालकांचीही धांदल उडाली.

पाण्यातून वाट काढणेदेखील वाहनचालकांना अवघड झाल्याचे चित्र मंगळवारी रात्री पाहायला मिळाले. सोपाननगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चिंचेचे झाड रात्री साडेआठच्या सुमारास कोसळले. त्यामुळे रस्त्यावरील चारदुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.

सर्वाधिक पावसाची नोंद

मंगळवारी पावसाच्या दमदार हजेरीमुळे शहरात ३५.८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यंदाच्या सप्टेंबर महिन्यातील आजचा सर्वाधिक पाऊस होता. याआधी शनिवारी (ता. २३) शहरात २५.६ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता.

पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (ता. २६) रात्री ८ ते ९ दरम्यान मुसळधार पाऊस झाला. चिंचवड लिंक रस्त्यावरील मैला शुद्धीकरण प्रकल्पासमोरील दुकानांमध्ये पाणी शिरले होते. अनेक भागात वाहतूक कोंडीही झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, जिल्ह्यातील ४१ मार्गांवर पाणी; राधानगरी धरणाचे ५ दरवाजे बंद, असा आहे पावसाचा अंदाज?

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नाशिकमध्ये पूरस्थितीची शक्यता

SCROLL FOR NEXT